Andhra Pradesh : आंध्रप्रदेशमध्ये ‘नन’चे प्रशिक्षण घेणार्‍या ख्रिस्ती मुलीने कॉन्व्हेंटमध्ये बाळाला दिला जन्म !

  • नवजात बालकाची मुलीकडून हत्या

  • मुलीशी संबंध असणार्‍या प्रशिक्षणार्थी पाद्य्राला अटक

अमरावती (आंध्रप्रदेश) – एलुरु येथील ‘सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हॉस्टेल’मध्ये ‘नन’चे प्रशिक्षण घेणार्‍या अल्पवयीन ख्रिस्ती मुलीने एका बाळाला जन्म दिला. त्यानंतर तिने या बाळाची हत्या केली. हे वसतीगृह एलुरुच्या ‘डायोसेसीन’ या चर्च-प्रशासित संस्थेच्या वतीने चालवले जाते. या प्रकरणी आंध्रप्रदेश पोलिसांनी एका प्रशिक्षणार्थी पाद्रीला कह्यात घेतले. त्या पाद्रीचे पीडित प्रशिक्षणार्थी ननसोबत संबंध होते.

१. याविषयीच्या एका वृत्तानुसार ‘नन’ बनण्याचे प्रशिक्षण घेत असलेली ही ख्रिस्ती मुलगी आंध्रप्रदेशातील नंदयाल जिल्ह्यातील असून ती सेंट जोसेफ कॉन्व्हेंटमध्ये द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे.

२. ८ डिसेंबर २०२४ या दिवशी तिने वसतीगृहात बाळाला जन्म दिला आणि लगेचच बाळाला खिडकीतून फेकून त्याची हत्या केली.

३. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महिला अन् बालकल्याण विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोचले. पोलीस निरीक्षक रमणा यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी अन्वेषण चालू केले.

४. या घटनेने कॉन्व्हेंट वसतीगृहाच्या प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड झाला आहे.

संपादकीय भूमिका

  • चर्चकडून चालवण्यात येणार्‍या संस्था या अनाचाराचे अड्डे बनले आहेत, याचे हे आणखी एक उदाहरण !
  • जगभरात पाद्य्रांनी मुलांचे लैंगिक अत्याचार केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. भारतातही अशा घटना समोर येत आहेत; मात्र नेहमी हिंदु पुजारी आणि संत यांना ‘खलनायक’ रंगवण्यात मग्न असणारी प्रसारमाध्यमे अशा घटनांना प्रसिद्धी देत नाही, हे जाणा !