Love Jihad : मुसलमानाने हिंदु तरुणीला ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकवून तिला ठार मारण्याचा केला प्रयत्न !

फेसबुकवरून झाली होती ओळख

नोएडा (उत्तरप्रदेश) – येथे तबिश असगर नावाच्या मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे खोटेच सांगून हिंदु मुलीशी लग्न केले. त्यानंतर पत्नीवर दबाव टाकून तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. या हिंदु तरुणीला कड्यावरून ढकलून ठार मारण्याचाही प्रयत्न त्याने केला. अंततः पीडित मुलीने पोलिसांकडे धाव घेतली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत मुसलमान तरुणाला अटक केली.

१. पीडित हिंदु तरुणीने सांगितले की, सुमारे ४ वर्षांपूर्वी तिने फेसबुकच्या माध्यमातून एका तरुणाशी संपर्क साधला होता. फेसबुकवर त्याचे नाव विशाल होते. पीडित तरुणीने त्याची भेटही घेतली होती. त्यावेळी त्याने त्याचे नाव विशाल राणा असून तो हिंदूंच्या राजपूत जातीची असल्याचे तिला खोटेच सांगितले आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले

२. २२ फेब्रुवारी २०२३ या दिवशी पीडित हिंदु तरुणी आणि विशाल राणा यांचे गाझियाबाद येथे हिंदु रितीरिवाजांनुसार लग्न झाले.

३. लग्नानंतर काही दिवसांनी स्वतःच्या पतीचे नाव विशाल राणा नसून तबिश असगर आहे, हे पीडित तरुणीला समजले. यावर तरुणीने प्रश्‍न उपस्थित केला असता भविष्याची भीती दाखवून तबिशने तिला गप्प केले.

४. त्यानंतर तबिश असगर याने पीडितेवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणण्यास चालू केले. त्याने पीडितेला जिवे मारण्याची धमकीही दिली.

५. तबिश याने पीडितेला १८ नोव्हेंबर २०२४ रोजी उत्तराखंडमधील रामनगर येथे नेले. तेथे त्याने पीडितेला कड्यावरून ढकलून ठार मारण्याचाही प्रयत्न केला.

६. पोलिसांत दिलेल्या तक्रारीत पीडितेने तबिश याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली आहे. ‘तबिश याचा भाऊ वसीम यालाही अटक करावी’, अशी मागणी पीडितेने केली आहे.

संपादकीय भूमिका

सामाजिक माध्यमांद्वारे हिंदु तरुणींशी स्वतः हिंदु असल्याचे सांगून ओळख करणार्‍या मुसलमानांचे प्रमाण सध्या वाढले आहे. याविषयी हिंदु तरुणी आणि त्यांचे पालक यांनी सतर्क रहाणे आवश्यक !