ब्रिटनचे बर्मिंघम शहर दिवाळखोर होण्यामागे पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिक !

संपूर्ण पाकिस्तानच आता आर्थिक दिवाळखोर होण्याच्या उंबरठ्यावर आहे. यातूनच पाकिस्तान्यांची पात्रता काय आहे ?, हे जगाला लक्षात आले असेलच !

(म्हणे) श्रीरामचरितमानसमध्ये ‘पोटॅशियम सायनाईड’ (विष) आहे ! – प्रा. चंद्रशेखर, शिक्षणमंत्री, बिहार

अन्य धर्मियांच्या धर्मग्रंथांचा असा अवमान करण्याचे धाडस प्रा. चंद्रशेखर करणार नाहीत; कारण त्याचे परिणाम काय हातील ?, हे त्यांना ठाऊक आहे !

१ ऑक्टोबरपासून जन्म प्रमाणपत्राद्वारे मिळवता येणार सर्व कागदपत्रे !

१ ऑक्टोबर २०२३ पासून जन्म प्रमाणपत्राविषयी (‘बर्थ सर्टिफिकेट’विषयी) नवीन नियम लागू होणार आहे. या नवीन नियमानुसार, जन्म प्रमाणपत्राच्या आधारे शाळा प्रवेशापासून ते वाहनचालक परवाना, सरकारी नोकरी, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पारपत्र, विवाह नोंदणी इत्यादी कागदपत्रे मिळवणे शक्य होणार आहे.

इजिप्तमध्ये शाळेत विद्यार्थिनींना नकाब वापरण्यावर बंदी !

जगभरातील काही इस्लामी देश महिलांवर लादण्यात येणारे निर्बंध हळूहळू शिथिल करत आहेत. भारतात मात्र शाळेत मुलींना हिजाब (डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र) घालण्यावर निर्बंध लादल्यावर बहुतांश मुसलमान थयथयाट करतात, हे लक्षात घ्या !

पुसेसावळी (जिल्‍हा सातारा) येथे संचारबंदी !

सामाजिक माध्‍यमांद्वारे कुणी आक्षेपार्ह लिखाण प्रसारित केले ? हे उघड असतांना त्‍याकडील लक्ष दुसरीकडे वळवण्‍यासाठी धर्मांध अकारण हिंदु जनआक्रोश मोर्चा आणि त्‍यात सहभागी हिंदु नेते यांवर आरोप करत आहेत ! धर्मांधांचा हा कावेबाजपणा लक्षात घ्‍या !

नात्यांतील दुरावा… !

मुलांवर संस्कार करणे तर दूरच; पण लहानपणापासून मुलांमध्ये पालकांविषयी जो विश्‍वास, प्रेम, आधार आणि आदर आवश्यक असतो, तोही ते करू शकलेले नसतात. नात्यातील हा दुरावा सहन न झालेले मग ‘डिटेक्टिव्ह नेमणे आहे’, या विज्ञापनांचे ग्राहक बनतात !

देहलीत आजपासून ‘जी-२०’ परिषद !

देहलीतील ‘भारत मंडपम्’ या भव्य सभागृहामध्ये ‘जी-२०’ शिखर परिषदेस प्रारंभ होणार आहे. दोन दिवसांच्या या परिषदेला २८ देशांचे प्रमुख आणि युरोपीयन युनियनचे प्रमुख उपस्थित रहाणार आहेत.

जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण राहिले पाहिजे ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

आरक्षण हे काही आर्थिक आणि राजकीय बरोबरीपुरते मर्यादित नाही, तर ते सामाजिक बरोबरी आणि मान मिळणे, यांसाठी आहे. त्यामुळे राज्यघटनासंमत आरक्षणाचे संघाने नेहमीच समर्थन केले आहे.

पोलीस तपासणी नाकी मलिदा खाण्यासाठीच आहेत का ? – बबन साळगावकर, माजी नगराध्यक्ष, सावंतवाडी

गोवा येथे हत्या करून तरुणीचा मृतदेह चारचाकीतून आंबोली येथे आणून घाटात फेकला जातो, याची कल्पना गोवा राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा येथील पोलिसांना नाही; मग अहोरात्र बांदा ते आंबोली या रस्त्यावर असणारे वाहतूक पोलीस झोपा काढत होते का ?