‘सर्व्हर डाऊन’ झाल्यामुळे राज्यात तलाठी भरती परीक्षेत गोंधळ !

तलाठी भरतीसाठी राज्यात २१ ऑगस्ट या दिवशी संभाजीनगर, अकोला, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांत परीक्षेच्या वेळी ‘सर्व्हर डाऊन’ झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला.

दादर (मुंबई) येथे अल्पवयीन हिंदु मुलीची छेड काढणार्‍या मुसलमान युवकाला नागरिकांकडून चोप !

अशा वासनांध धर्मांधांचा प्रतिकार करण्यासाठी सरकारने सर्वत्रच्या युवती आणि महिला यांना स्वसंरक्षण प्रशिक्षण द्यायला हवे !

साधूच्या वेशातील व्यक्तीकडून ५ वर्षांच्या मुलाची भूमीवर आपटून हत्या !

मथुरा येथील गोवर्धन भागात राधाकुंडाजवळ साधूच्या वेशात आलेल्या एका व्यक्तीने येथे खेळणार्‍या एका ५ वर्षांच्या मुलाला भूमीवर आपटून ठार मारले. येथे उपस्थित लोकांनी या व्यक्तीला लगेच पकडून चोपले आणि पोलिसांच्या कह्यात दिले.

उद्योगपती रतन टाटा यांना ‘उद्योगरत्न’ पुरस्कार प्रदान !

उद्योगपती रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यंदाचा ‘उद्योगरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. टाटा यांच्या मुंबईतील निवासस्थानी हा पुरस्कार देण्यात आला.

 चिपळूण एस्.टी. आगाराकडून महिलांसाठी विशेष सुविधा

महिलांनी गट आरक्षण (ग्रुप बुकिंग) केल्यास त्यांना ६५५ रुपयांत अष्टविनायक दर्शन घेण्याची सुविधा चिपळूण आगाराकडून देण्यात आली आहे.

‘इंस्‍टाग्राम’वर देवतांचे विडंबन करणारी बनावट खाती आणि चालक यांवर कारवाई करा ! – अधिवक्‍ता महेश धांडे

महापुरुष आणि देवता यांचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्‍यासाठी सक्षम कायदा शासनकर्ते केव्‍हा करणार आहेत ?

उपाहारगृहांतील अन्नाच्या नमुन्यांच्या पडताळणीतून गंभीर प्रकार उघड झाल्यास ‘मकोका’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवू ! – मंत्री धर्मरावबाबा आत्राम

‘असे प्रकार वारंवार होत राहिल्यास संबंधित हॉटेल्सचा परवानाही रहित करण्यात येईल’, अशी चेतावणीही त्यांनी दिली.

सिंधुदुर्ग : स्वातंत्र्यदिनाची सुटी असूनही नळयोजनेतील बिघाड दुरुस्त करण्यात अधिकारी आणि कर्मचारी यांचा पुढाकार

ग्रामविकास अधिकारी, उपसरपंच, कर्मचारी वर्ग यांनी त्यांना मोलाची साथ देत पाण्याच्या पंपाचा बिघाड दुपारपर्यंत दूर केला. स्वातंत्र्यदिनाची सुटी असतांनाही खंडित पाणीपुरवठा सुरळीत करून ग्रामस्थांचे मन जिंकत शासकीय कर्मचार्‍यांनी विश्वासार्हता कायम राखली !

चावडी, काणकोण (गोवा) येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंतीला मद्यालयाच्या मालकाचा विरोध

शाळेजवळील मद्यालय बंद करून त्याला अनुज्ञप्ती देणार्‍या अबकारी खात्याच्या अधिकार्‍यांवर कारवाई व्हायला हवी !

हिमाचल प्रदेशात हाहा:कार : आतापर्यंत ६० हून अधिक लोक मृत्यूमुखी !

गेल्या ४-५ दिवसांपासून पहाडी राज्ये असलेल्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले असून आणखी २ दिवस मुसळधार पाऊस चालू राहील, अशी चेतावणी हवामान खात्याने दिली आहे.