रफिकने स्वत:च्या पत्नीसमोर हिंदु महिलेवर केला बलात्कार : बलपूर्वक धर्मांतर !

  • कर्नाटकमध्ये ‘लव्ह जिहाद’चे आणखी एक प्रकरण उजेडात !

  • रफिक आणि त्याच्या पत्नीकडून पीडितेला बुरखा घालण्याची, तसेच कपाळावर कुंकू न लावण्याची सक्ती

बेळगावी (कर्नाटक) – कर्नाटकात ‘लव्ह जिहाद’ची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्यातील बेळगावी येथे रफिक नावाच्या मुसलमान तरुणाने स्वत:च्या पत्नीसमोर २८ वर्षीय विवाहित हिंदु महिलेवर बलात्कार केला. यासह पीडित महिलेची अश्‍लील छायाचित्रे काढून तो तिला ‘ब्लॅकमेल’ करू लागला आणि त्याने पीडित महिलेला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले. आरोपी रफिक आणि त्याच्या पत्नीने पीडितेला बुरखा घालण्याची, तसेच कपाळावर कुंकू न लावण्याची सक्ती केली. या प्रकरणी पोलिसांनी रफिक आणि इतर आरोपींना अटक केली आहे.

१. पोलिसांनी सांगितले की, रफिक आणि त्याच्या पत्नीने पीडित महिलेला ब्लॅकमेल केले आणि तिला बेळगावी येथील त्यांच्या घरात रहाण्यास भाग पाडले.

२. पीडित महिलेने तिच्या पतीला घटस्फोट द्यावा, यासाठी रफिकने तिच्यावर दबाव आणला. मागणी मान्य न केल्यास तिची अश्‍लील छायाचित्रे प्रसिद्ध करण्याची धमकी रफिकने दिली होती, असे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

३. या प्रकरणी आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

संपादकीय भूमिका 

अशा घटना म्हणजे हिंदूंनी काँग्रेसला निवडून दिल्याची शिक्षाच होय !