|

हुब्बळ्ळी (कर्नाटक) – नेहा हिरेमठ हत्या प्रकरणातील आरोपी फैयाज खोंडुनाईक हा एकटाच आरोपी नसून त्याला साहाय्य करणार्या एकूण ८ जणांविषयी पोलिसांना स्पष्ट माहिती दिली आहे. असे असले, तरी फैयाजची अटक सोडली, तर पोलिसांनी दुसरे काहीही काम केलेले नाही, अशा शब्दांत नेहाचे वडील आणि काँग्रेसचे येथील नगरसेवक निरंजन हिरेमठ यांनी संताप व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, या प्रकरणाच्या चौकशीविषयी पोलिसांनी आमच्याकडून अधिक माहिती घेण्याचे कामही केलेले नाही. हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात यावे. सीबीआयने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मी केंद्रशासनाकडे विनंती केली आहे. ‘माझा जीव गेला, तरी हरकत नाही. माझ्या मुलीचा जीव घेणार्याला शिक्षा होईलच, यासाठी मी वचनबद्ध आहे’, असे ते म्हणाले.
… अन्यथा मलाच कायदा हातात घेऊन माझ्या मुलीला न्याय द्यावा लागेल !
एका वृत्तवाहिनीशी बोलतांना ते म्हणाले की, फैयाजला कठोर शिक्षा झाली, तरच नेहाच्या आत्म्याला शांती मिळेल. माझ्या मुलीने धर्मांतराला विरोध केल्यामुळे तिची हत्या करण्यात आली आहे; परंतु माझ्या मुलीला न्याय मिळेल, याची मला निश्चिती नाही. पोलीस कुणाच्यातरी हातातील कळसुत्री बाहुली असल्यासारखे वागत आहेत. राज्य शासनाकडून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सीबीआयकडे चौकशी हस्तांतरित करण्यात आली नाही, तर मलाच कायदा हातात घेऊन माझ्या मुलीला न्याय द्यावा लागेल, असेही हिरेमठ म्हणाले.
संपादकीय भूमिका
|
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !
पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment
NCERT Introduces Emergency : ‘एन्.सी.इ.आर्.टी.’च्या इयत्ता ९ वीच्या पुस्तकात आणीबाणीची माहिती समाविष्ट
देवता, भारतमाता आणि राजकीय हुतात्मा यांच्या नावाने शपथ घेतली जाऊ शकत नाही ! – Kerala High Court