वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
नवी देहली – उत्तर देहलीच्या जहांगीरपुरीमध्ये एक बिर्याणी विक्रेता प्रभु श्रीरामाचे चित्र असलेल्या ‘डिस्पोजेबल’ (एकदाच वापरण्यायोग्य) प्लेट्समध्ये लोकांना मटण बिर्याणी देतांना आढळल्याने गोंधळ उडाला. स्थानिक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्याने ही घटना उघडकीस आली.
सौजन्य VK News
या कार्यकर्त्याने विक्रेत्याकडे चौकशी केली आणि त्याच्या लक्षात आले की, लोकांना या ‘प्लेट्स’मध्ये मटण बिर्याणी दिली जात होती. या प्लेट्सनंतर कचरापेटीत फेकल्या जात होत्या. यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी श्रीरामाची विटंबना करणार्या विक्रेत्याच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन विक्रेत्याला कह्यात घेतले आणि भगवान श्रीरामाचे चित्र असलेल्या प्लेट्स जप्त केल्या.
संपादकीय भूमिकाहिंदूबहुल भारताच्या राजधानीत हिंदूंच्या आराध्य देवतेचे अशा प्रकारे अश्लाघ्य विडंबन होणे, हे हिंदूंना लज्जास्पद ! |