वेंगुर्ला येथील पत्रकार सुरेश कौलगेकर यांना राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार घोषित
कौलगेकर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून क्रीडा, कला, शिक्षण, साहित्य, पर्यटन, कृषी या क्षेत्रांत पत्रकारिता करतांना अनेक दुर्लक्षित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या सर्वांगीण कार्याची नोंद घेऊन त्यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला.