
देवगड – तालुक्यातील कोटकामते ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या ३६ लाख ८१ सहस्र १०५ रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणी पोलिसांनी ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच सायली प्रदीप पारकर यांना २५ एप्रिल या दिवशी अटक केली. पारकर यांना न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने त्यांना २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी बजावली. भ्रष्टाचाराच्या प्रकरणी महिला सरपंचांवर कारवाई होण्याची देवगड तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.
ग्रामस्थांच्या लढ्याला यश !ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराच्या विरोधात ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा करून लढा दिला होता. देवगड पंचायत समितीच्या कार्यालयासमोर ग्रामस्थांनी उपोषणही केले होते. या प्रकरणातील संशयितांवर आता कारवाई होत असल्याने ग्रामस्थांच्या लढ्याला यश आले आहे. (ग्रामपंचायत हा केवळ गावाच्या नव्हे, तर देशाच्या विकासाचा पाया असतो. त्यामुळे येथील लोकप्रतिनिधी आणि ग्रामसेवक प्रामाणिक असतील, तरच हा पाया भक्कम होऊ शकतो. याचे भान लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी ठेवायला हवे. – संपादक) |
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोटकामते ग्रामपंचायतीमध्ये वर्ष १ एप्रिल २०१९ ते २१ मार्च २०२१ या कालावधीत ग्रामपंचायत निधी, पाणीपुरवठा योजना निधी, १४ वा वित्तआयोगाचा निधी, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामयोजना निधी, अनुसूचित जातीजमाती आणि नवबौद्ध विकास योजना या योजनांच्या आर्थिक व्यवहारात तत्कालीन सरपंच पारकर आणि ग्रामसेवक दीपक केतकर यांनी अपहार केल्याची तक्रार पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नीलेश जगताप यांनी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. त्यानुसार पारकर यांना २५ एप्रिलला अटक करण्यात आली.
संपादकीय भूमिकादेशाच्या विकासाचा पाया असलेल्या ग्रामपंचायती भ्रष्टाचाराने पोखरलेल्या असतील, तर देशाचा विकास होणार तरी कसा ? |
फुलचंद रोकडे यांच्याकडून योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी वस्त्रदान आणि धोंडे जेवण
पिंपरी-चिंचवड बसस्थानकातील एका बसचे छत उखडले !
कराड येथे जप्त केलेले ‘सायलेन्सर’ आणि ‘प्रेशर हॉर्न’ ‘रोडरोलर’ने चिरडले !
लोकलमध्ये हिंदूला चाकूने भोसकले; मुसलमानासह तिघे कह्यात !
Shivayogi Lohar Suspended : लव्ह जिहादचे प्रकरण दडपणारा पोलीस निरीक्षक निलंबित !
छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर अत्याचार करणार्या शिक्षकाला अटक !