सचिन वाझे याला पुन्हा सेवेत घेणे, ही सरकारची चूक ! – अबू आझमी
सचिन वाझे याला पुन्हा पोलीस सेवेत घेण्यास माझा विरोध होता. त्यासाठी मी शरद पवार, संजय राऊत आणि अनिल देशमुख यांना सांगितले होते; पण माझे ऐकले गेले नाही. सरकारने ही मोठी चूक केली असे वक्तव्य अबू आझमी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले.