खासदार शरद पवार यांच्यावर ३१ मार्च या दिवशी होणार पित्ताशयाचे शस्त्रकर्म

खासदार शरद पवार

मुंबई – प्रकृती अस्वास्थ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांना २९ मार्च या दिवशी ब्रीच कँडी रुग्णालयात भरती करण्यात आले. पित्ताशयाच्या त्रासामुळे ३१ मार्च या दिवशी त्यांच्यावर शस्त्रकर्म केले जाणार आहे. पुढील २ आठवडे ते घरी विश्रांती घेणार आहेत. त्यामुळे पश्‍चिम बंगालच्या निवडणुकीसाठी त्यांचा नियोजित प्रचारदौरा रहित करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांची मुलगी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.