(म्हणे) ‘निवडणुकीत धार्मिक प्रश्नाच्या आधारे वातावरण निर्माण करणे अयोग्य !’ – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

देशाचे पंतप्रधान धर्माचा आधार घेऊन घोषणा देतात, याचे आश्चर्य वाटते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपर्यंत अध्यक्षपदी रहाणार ! – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

सुप्रिया सुळे यांच्यावर अध्यक्षपदाची धुरा सोपवण्याचा विचार आताच करता येणार नाही. पक्ष आणि कार्यकर्ते यांच्यासाठी मी निवृत्ती मागे घेतली. पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपर्यंत मीच अध्यक्षपदी रहाणार आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

प्रसारमाध्यमांनी राष्ट्रहित जपावे !   

जसाजसा काळ पुढे चालला आहे, तसा या वाहिन्यांमधील परिपक्वपणा, समंजसपणा वाढण्याच्या ऐवजी बालिशपणा, बाजारू वृत्ती, उथळ बातम्या देण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी अंतर्मुख होऊन कोणत्या बातम्यांना प्राधान्य द्यायला हवे ? याचा विचार करावा !

देहलीचा नेता आणि गल्लीचे राजकारण !

मागील काही दिवस महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या नावाची चर्चा आहे. ‘लोक माझे सांगाती’ या स्वत:च्या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये त्यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली.

पक्षांतर्गत बंडाळीची चिन्हे शमवण्यासाठी शरद पवार यांनी केलेले नाटक होते ! – संजय शिरसाट, आमदार, शिवसेना

शरद पवार यांनी त्यांच्या त्यागपत्राचा निर्णय मागे घेत असल्याची घोषणा केल्यानंतर संजय शिरसाट यांनी या संपूर्ण प्रकाराला ‘राष्ट्रवादी नाट्य’ संबोधले आहे.

शरद पवार यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या अध्‍यक्षपदाची धुरा पुन्‍हा स्‍वत:कडे घेतली !

राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या राष्‍ट्रीय अध्‍यक्षपदावरून निवृत्त होत असल्‍याची घोषणा करणार्‍या शरद पवार यांनी त्‍यांचा निर्णय मागे घेत पुन्‍हा या पदाची धुरा स्‍वत:कडे घेतली आहे.

शरद पवार यांचे त्यागपत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य समितीने एकमताने फेटाळले !

शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचे दिलेले त्यागपत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य समितीने फेटाळले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात ५ मे या दिवशी या समितीच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.

कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करणार नाही ! – शरद पवार

जो निर्णय मी घेतला आहे, तो पक्षाच्या भवितव्यासाठी आहे. तरीही यावर पुनर्विचार करून मी दोन दिवसानंतर निर्णय घेईन.

राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या अध्‍यक्षपदासंबंधी ५ मे या दिवशी समितीचा जो निर्णय होईल तो मान्‍य ! – शरद पवार, अध्‍यक्ष, राष्‍ट्रवादी काँग्रेस

त्‍यागपत्र देतांना वरिष्‍ठ नेते आणि माझे कार्यकर्ते यांना विश्‍वासात घ्‍यायला हवे होते. अध्‍यक्षपदासाठी जी समिती नेमली आहे, त्‍यांनी ५ मे या दिवशी बैठक घ्‍यावी, त्‍यात जो काही निर्णय येईल, तो मला मान्‍य असेल, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

निवृत्तीच्या निर्णयावर शरद पवार फेरविचार करणार !

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीच्या निर्णयावर फेरविचार करणार आहे, असे संकेत दिले आहेत. त्यांच्या निर्णयाला पक्षातून तीव्र विरोध होत आहे. कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर या कार्यक्रमस्थळीच ठिय्या मांडत या निर्णयाला विरोध केला.