राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी !
गृहविभागाने लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी ! – राष्ट्रवादी काँग्रेसची
पोलीस आयुक्तांकडे तक्रारद्वारे मागणी
गृहविभागाने लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी ! – राष्ट्रवादी काँग्रेसची
पोलीस आयुक्तांकडे तक्रारद्वारे मागणी
कुणीतरी भ्रमणभाषवर काहीतरी संदेश पाठवला. तो चुकीचा असेल; पण त्यासाठी रस्त्यावर उतरून त्याला धार्मिक स्वरूप देणे, हे योग्य नाही. सत्ताधारी पक्ष या घटनांना प्रोत्साहित करतो, अशी टीका शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्या सरकारवर केली.
‘हिंदु आतंकवाद’ असा शब्दप्रयोग करून मुसलमानांची एकगठ्ठा मते मिळवू पहाणारे राजकारणी समाजासाठी धोकादायक !
शहराच्या नावाला मला ‘संभाजीनगर’ म्हणायचे नाही, तर ‘औरंगाबाद’च म्हणायचे आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ७ जून या दिवशी येथे केले. छत्रपती संभाजीनगर येथील सौहार्द या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते.
एका कार्यक्रमात बोलतांना शरद पवार यांनी केरळमधील चर्चवरील आक्रमणाचे सूत्र उपस्थित करत देशात मुसलमान आणि ख्रिस्ती असुरक्षित असल्याचे विधान करत भाजपवर टीका केली. त्यावर नीलेश राणे यांनी वरील वक्तव्य केले.
केरळमध्ये ३२ सहस्रांहून अधिक मुलींचे आयुष्य लव्ह जिहादने उद्ध्वस्त होते, तेव्हा त्यामागची ‘विशिष्ट विचारधारा’ पवार यांना दिसत नाही, हे लक्षात घ्या !
संसद भवनाच्या स्थळी हिंदु धर्मानुसार शास्त्रोक्त पूजन झाले. हे पवार यांना खटकल्यामुळे ते आता विज्ञानवादाच्या गप्पा मारत आहेत, हे सूज्ञ नागरिक जाणून आहेत !
शेवगाव येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने निघालेल्या मिरवणुकीवर धर्मांधांनी दगडफेक करून दंगल केली. असे असतांना पवार त्यांचे नेहमीचे ‘खोटे बोल पण रेटून बोल’ हा प्रकार काही थांबवत नाहीत !
शरद पवार हे जर भाजपला नैतिकता शिकवत असतील, तर इतिहासात जावे लागेल. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांचे सरकार कसे गेले ?, येथून प्रारंभ होईल.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची एकजूट होत असतांना मी बाजूला होणे योग्य नाही. त्यामुळे मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून दूर होण्याचा निर्णय मागे घेतला, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.