मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा करणार्या शरद पवार यांनी त्यांचा निर्णय मागे घेत पुन्हा या पदाची धुरा स्वत:कडे घेतली आहे. ५ मे या दिवशी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी हा निर्णय घोषित केला. विशेष म्हणजे या वेळी त्यांच्या समवेत ना सौ. सुप्रिया सुळे होत्या, ना अजित पवार होते. त्यांच्या समवेत व्यासपिठावर केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. ‘अजित पवार पत्रकार परिषदेत का नाहीत ?’ असे पत्रकारांनी विचारल्यावर ‘पत्रकार परिषदेला सर्व असतात का ?’, असे उत्तर पवारांनी दिले.
या वेळी शरद पवार म्हणाले, ‘‘६३ वर्षांच्या सेवेनंतर मी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता; परंतु मी घेतलेल्या निर्णयाने जनमानसामध्ये तीव्र भावना निर्माण झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली. ‘मी येण्याचा फेरविचार करावा’, यासाठी कार्यकर्त्यांनी संघटित होऊन एकमताने मला आवाहन केले. या सर्वांचा विचार करून मी पुन्हा अध्यक्षपदाचे दायित्व स्वीकारत आहे; मात्र भविष्यात पक्षाचे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक आहे. पुढील कार्यकाळात पक्षामध्ये नवीन नेतृत्व निर्माण होणे आवश्यक आहे. सहकार्यांचा विचार घेऊन नवीन नेतृत्वाचा निर्णय घेण्यात येईल. नवीन नेतृत्व निर्माण करण्यावर माझा भर असेल. यापुढे पक्षवाढीसाठी, तसेच पक्षाची विचारधारा जनमानसांत पोचवण्यासाठी मी जोमाने काम करीन. पक्षात संघटनात्मक पालट करण्यात येणार आहेत. साम्यवादी पक्ष, काँग्रेस यांचे सहकार्य घेऊ.
#AajKiBaat : पवार आज तो मान गए…अब आगे का प्लान क्या, क्या अजित पवार को शरद पवार का फैसला पहले से पता था ?#SharadPawar #NCP #AjitPawar #MaharastraPolitics @RajatSharmaLive pic.twitter.com/4atnO5X9EM
— India TV Hindi (@IndiaTVHindi) May 5, 2023
सुप्रिया सुळे या राष्ट्रीय अध्यक्ष होणार यामध्ये तथ्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा एखाद-दुसरा नेता भाजपच्या संपर्कात असेल; मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात भाजपच्या संपर्कात आहेत, यात तथ्य नाही. ‘सामना’च्या अग्रलेखात असे ज्यांनी लिहिले त्यांना हा प्रश्न विचारा, असे शरद पवार म्हणाले. उत्तराधिकारी किती दिवसांत सिद्ध होईल, असे पत्रकारांनी विचारले असता, राजकीय पक्षांमध्ये उत्तराधिकारी ठरत नसतो. हा एका व्यक्तीचा निर्णय असू शकत नाही. राज्यपातळीवर काही कार्यकर्ते अनेक वर्षे काम करत आहेत त्यांच्याकडे दायित्व देण्यात येईल, तसेच काही जणांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी दिली जाईल. भविष्यात महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करू, असे पवार म्हणाले.
शरद पवार ही बने रहेंगे NCP अध्यक्ष, कमेटी की बैठक में इस्तीफा नामंजूर https://t.co/48oqsclxIo via @YouTube #news #SharadPawar
— INDIA WATCH (@Indiawatchtv) May 5, 2023
शरद पवार यांच्या पत्नी सौ. प्रतिभा पवार उपस्थित होत्या, तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते; मात्र अजित पवार उपस्थित नव्हते. याविषयी पत्रकारांनी विचारले असता पवार म्हणाले, ‘‘अजित पवार नाराज नाहीत. त्यांना माझ्या निर्णयाची माहिती दिली होती. ते देहलीला गेल्याची माहिती खोटी आहे.’’