कधी कधी वाटते औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार ! – नीलेश राणे, भाजप

नीलेश राणे व शरद पवार

मुंबई – निवडणूक जवळ आली की, पवारसाहेब मुसलमान समाजासाठी चिंताग्रस्त होतात. कधी कधी वाटते औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार, असे ट्वीट भाजपचे नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी केले आहे.

एका कार्यक्रमात बोलतांना शरद पवार यांनी केरळमधील चर्चवरील आक्रमणाचे सूत्र उपस्थित करत देशात मुसलमान आणि ख्रिस्ती असुरक्षित असल्याचे विधान करत भाजपवर टीका केली. हिंदूंवरील अत्याचारांविषयी गप्प रहाणार्‍या शरद पवार यांच्या या विधानावरून नीलेश राणे यांनी वरील वक्तव्य केले.