मंदिर संस्कृती रक्षणार्थ हिंदु संघटनांचे योगदान !

आजही सनातन हिंदु धर्माची आधारशीला असणार्‍या मंदिर संस्कृतीला अनेक आघातांना सामोरे जावे लागत आहे. दक्षिण भारतात मंदिरविरोधी विविध कायद्यांमुळे हिंदु मंदिरात भ्रष्टाचार होत आहे.

E. Sreedharan On Kerala Temples : हिंदूंच्या मंदिरांना येणारी समस्या दूर करण्यासाठी प्रसिद्ध अभियंते ई. श्रीधरन् यांनी केरळ उच्च न्यायालयात याचिका

प्रश्‍न हिंदूंच्या मंदिरांचा असल्यामुळेच केरळमधील साम्यवादी आघाडी सरकारने ई. श्रीधरन् यांच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले, यात आश्‍चर्य ते काय ?

मंदिरांच्या सहस्रो एकर भूमीवर अतिक्रमण ! – अनुप जयस्वाल, सचिव, देवस्थान सेवा समिती, विदर्भ, महाराष्ट्र

मंदिरांच्या भूमी भाडेतत्त्वावर देण्यात आल्या होत्या. इंदिरा गांधी यांनी ‘सिलिंग’चा कायदा लावला, तेव्हा ‘मंदिराच्या भूमींचे भाडे द्यायचे नाही’, असा अपप्रचार करण्यात आला. तेव्हापासून त्या भूमींचे भाडे देणे बंद झाले.

बांगलादेशातील हिंदु आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत !

मानवता हा धर्म मानला, तर तो बांगलादेशी हिंदूंच्या संदर्भात लागू होत नाही का ? भारतात जनगणना होऊन घुसखोर बांगलादेशींना हाकलून लावणे, हाच यावर उपाय आहे. बांगलादेशात २ कोटीहून अधिक हिंदू असूनही तेथील मंदिरे असुरक्षित असणे लज्जास्पद !

मां श्री चामुंडामातेच्यामूर्तीसमोर २ बुरखाधारी महिलांनी फेकले मांस !

हिंदुद्वेषी कृत्य करणार्‍या धर्मांध मुसलमान महिला ! बुरख्याचा अशा प्रकारे वापर होत असल्याने बुरख्यावर बंदीच घातली पाहिजे ! उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांधांचे असे हिंदुद्वेषी कृत्य करण्याचे धाडस कसे होते ?

मंदिर अर्थव्यवस्थेमुळे भारताचा विकास !

 प्राचीन भारताच्या संस्कृतीचा बारकाईने अभ्यास केल्यास मंदिरे ही केवळ तीर्थक्षेत्रे नव्हती, तर एक सामुदायिक ठिकाणेही होती, असे स्पष्ट होते.

Bangladesh Hindu Attack : बांगलादेशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात आक्रमणे – २ हिंदु नगरसेवकांची हत्‍या

बांगलादेशातील हिंदूंचा निर्वंश होईपर्यंत हे चालूच रहाणार आहे; कारण तेथील हिंदूंमध्‍ये प्रतिकार करण्‍याची क्षमता नाही, भारतातील धर्मनिरपेक्ष सरकार कधीही साहाय्‍य करणार नाही आणि जागतिक समुदाय त्‍यांच्‍याकडे ढुंकूंनही पहाणार नाही !

सरकारीकरण झालेल्‍या मंदिरांमध्‍ये ऑनलाइन सेवांची पूर्तता करण्‍यात अडचणी : पुजार्‍यांनी मांडली व्‍यथा !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्‍परिणाम ! यासाठी मंदिरे भक्‍तांच्‍याच कह्यात हवीत !

कर्नाटकातील तुमकुरु पालिकेची श्री सिद्धिविनायक मंदिर पाडून मोठे व्‍यापारी संकुल बांधण्‍याची योजना !

या जागी मशीद असती, तर तुमकुरु पालिकेने असा निर्णय घेतला असता का ? काँग्रेसच्‍या राज्‍यात याहून वेगळे काय होणार ?

मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांचे निर्देश डावलून मुंबई येथील मुंबादेवी मंदिरासमोर बांधकाम !

मुंबादेवी मंदिराच्या दर्शनी भागात चालू असलेले बांधकाम त्वरित थांबवण्याचे आदेश मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेले असतांना कंत्राटदाराच्या लाभासाठी महापालिका अधिकार्‍यांनी काम चालू ठेवले.