‘भाषा आणि तिची लिपी यांचा परस्परांशी संबंध असतो का ? भाषा आणि लिपी यांतील सात्त्विकता कोणत्या घटकांवर अवलंबून असते ? संस्कृत भाषेची निर्मिती कशी झाली ?’, यांविषयी देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे.
(भाग १)
१. भाषा आणि तिची लिपी यांचा परस्परांशी असलेला संबंध

व्यक्तीचे शरीर आणि तिचा प्राण यांचा जसा परस्परांशी संबंध असतो, तसा भाषा अन् तिची लिपी यांचा घनिष्ठ संबंध असतो. ज्याप्रमाणे प्राण गेल्यास व्यक्तीच्या शरिराचे कार्य संपते, त्याप्रमाणे भाषेनुसार तिची लिपी नसल्यास भाषेतील देवत्व हरपते. भाषा आणि तिची लिपी यांच्यामध्ये अनुबंध (दुवा) असतो.
१ अ. ‘भाषा आणि तिची लिपी यांच्यामध्ये अनुबंध असतो’, म्हणजे काय ? : ‘अनुबंध’ या शब्दातील ‘अनु’ म्हणजे जोडणे आणि ‘बंध’ म्हणजे विशिष्ट नियम. भाषा आणि तिची लिपी या विशिष्ट नियमांच्या आधारे एकमेकांशी जोडलेल्या आहेत. भाषा आणि तिची लिपी व्यवहार अन् अध्यात्म यांदृष्टीने एकमेकांसाठी पूरक असतात. त्यामुळे ‘भाषा आणि तिची लिपी यांच्यामध्ये अनुबंध असतो’, असे म्हटले आहे. भाषेतील शब्दांनुसार तिचा उच्चार आणि त्यानुरूप तिची लिपी सिद्ध होते.
२. भाषा आणि तिची लिपी यांमध्ये सात्त्विकता निर्माण होण्यासाठी आवश्यक असलेले घटक
२ अ. भाषेचा निर्माता : भाषेची निर्मिती विशिष्ट देवतेने केलेली असल्यास ती भाषा सात्त्विक असते. भाषेची निर्मिती विशिष्ट देवतेच्या राजसिक किंवा तामसिक गणाने केली असेल, तर ती भाषा राजसिक किंवा तामसिक होते अन् भाषेची निर्मिती अनिष्ट शक्तीने केली असल्यास ती भाषा त्रासदायक शक्तीने भारित असते. याचा अर्थ ‘एखाद्या भाषेचा निर्माता कोण आहे ?’, यावरून ती भाषा ‘सात्त्विक, राजसिक, तामसिक किंवा त्रासदायक शक्तीने भारित आहे’, हे ठरते.
२ आ. भाषेच्या निर्मितीमागील उद्देश
२ आ १. भाषेच्या निर्मितीमागील उद्देशांचे प्रकार
२ आ १ अ. सात्त्विक उद्देश : प्राचीन काळापासून संस्कृत भाषा समाजात सर्वत्र प्रचलित आहे; परंतु समाजाची सात्त्विकता घटल्याने व्यक्तीला संस्कृत भाषा कठीण वाटू लागली. तिला पर्यायी भाषा म्हणून मराठी भाषेची निर्मिती झाली. त्यानंतर व्यक्तीची सात्त्विकता आणखी घटू लागली. तेव्हा ‘हिंदी’ या भाषेची निर्मिती झाली. संस्कृत भाषेला ‘मराठी’ आणि ‘हिंदी’ या पर्यायी भाषांची निर्मिती झाली. ही निर्मिती व्यक्ती आणि समाज यांच्या व्यावहारिक अन् आध्यात्मिक कल्याणासाठी पूरक आहे. त्यामुळे ‘मराठी’ आणि ‘हिंदी’ या भाषांच्या निर्मितीमागील उद्देश सात्त्विक आहे.
२ आ १ आ. राजसिक उद्देश : संस्कृत, मराठी आणि हिंदी या सात्त्विक भाषांना छेद देण्याचे कार्य भारतातील काही प्रांतीय भाषांनी केले; म्हणून ‘या भाषांच्या निर्मितीमागील उद्देश राजसिक होता’, असे म्हटले आहे.
२ आ १ इ. तामसिक उद्देश : संस्कृत, मराठी आणि हिंदी या सात्त्विक भाषांचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी भारताबाहेरील काही राष्ट्रांमध्ये काही भाषांची निर्मिती झाली; म्हणून ‘या भाषांच्या निर्मितीमागील उद्देश तामसिक होता’, असे म्हटले आहे.
२ आ २. भाषेची रचना : भाषेतील शब्द, त्यांचा उच्चार, भाषेचे व्याकरण आणि तिची लिपी यांच्या रचनेवर त्या भाषेतील सात्त्विकता अवलंबून असते.
३. भाषा आणि तिची लिपी यांचा परस्परांशी असलेला आध्यात्मिक संबंध
प्रत्येक भाषेत विशिष्ट शक्ती आहे. ती सात्त्विक, राजसिक, तामसिक आणि त्रासदायक या स्वरूपात असते. भाषेतील विशिष्ट शक्तीचा विस्तार तिच्या लिपीद्वारे होतो. ज्याप्रमाणे पावसाच्या ढगांमध्ये बाष्पकण असतात आणि बाष्पकणांतील शक्ती पुढे पावसाच्या थेंबांत प्रगट होते, त्याप्रमाणे भाषेतील शक्ती ही तिच्यातील शब्द अन् लिपी यांद्वारे प्रगट होऊन कार्य करते.
४. भाषेतील विविध शब्दांची निर्मिती कशी होते ?
त्रिगुण आणि पंचतत्त्वे या घटकांतून भाषेतील शब्दांची निर्मिती होते. त्यांपैकी एका शब्दाच्या निर्मितीचे उदाहरण पुढे दिले आहे.
४ अ. भाषेतील ‘अ’ या शब्दाची निर्मिती : ‘अ’ या शब्दातील ‘३’ या आकड्याप्रमाणे दिसणारा आकार हा पृथ्वीतत्त्वाशी संबंधित आहे. त्या आकाराला जोडून आडवी आणि उभी रेष आहे. या रेषा आपतत्त्वाशी संबंधित आहेत आणि ‘अ’ या शब्दावरील रेष ही तेजतत्त्वाशी संबंधित आहे.
४ आ. ‘अ’ या शब्दाच्या उच्चारातून होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया : जेव्हा व्यक्ती ‘अ’ या शब्दाचा उच्चार करते, तेव्हा तो शब्द पृथ्वी, आप आणि तेज या तत्त्वांपासून विलग होतो. जेव्हा ‘अ’ या शब्दाचा उच्चार पूर्ण होतो, तेव्हा वातावरणावर त्या शब्दलहरींचा परिणाम होतो. हा परिणाम वायुतत्त्वाशी संबंधित असतो. काही क्षणांतच त्या शब्दलहरी वातावरणात विरून जातात. तेव्हा त्या शब्दांचे अस्तित्व संपून जाते. ही प्रक्रिया आकाशतत्त्वाशी संबंधित असते.
५. संस्कृत भाषा पृथ्वीवर कशी अवतरित झाली ?
प्राचीन काळापासून संस्कृत भाषा समाजात प्रचलित आहे. संस्कृत भाषा पृथ्वीवर ऋषिमुनींच्या माध्यमातून अवतरित झाली आहे. पृथ्वीवरील आणि देवलोकांतील संस्कृत भाषा यांत भिन्नता आहे. ‘संस्कृत भाषा सर्वप्रथम पृथ्वीवर कशी अवतरित झाली ?’, याविषयीची सूक्ष्मातील प्रक्रिया पुढच्या लेखात दिली आहे.’
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१०.२०२३)
याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/886916.html
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात. सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात. |