मुसलमान आणि ख्रिस्ती दफनभूमीच्या जागेची जिल्हाधिकार्‍यांनी स्वतः जाऊन पहाणी करावी ! – नितीन शिंदे, माजी आमदार

श्री. नितीन शिंदे

सांगली – सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून मुसलमान आणि ख्रिस्ती समाजातील बांधवांसाठी दफनभूमीचा प्रश्न पुष्कळ महत्त्वाचा झाला आहे. शामरावनगर येथील दफनभूमीसाठीच्या जागेत १२ मास दलदल असते. येथे भुयारी गटारीच्या वाहिनी आहेत. येथे दफनभूमी करण्यास दोन्ही समाजांचा विरोध आहे. असे असतांना स्थानिक वृत्तपत्रातून सदर ‘दफनभूमीसाठी महापालिकेने पैसे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केले’, अशा आशयाची वृत्ते वाचण्यात आली. तरी ही जागा तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे का ? येथे होणारा व्यय अनाठायी होणार नाही ना ? हे पहावे लागेल. यासाठी मुसलमान आणि ख्रिश्चन दफनभूमीच्या जागेची जिल्हाधिकार्‍यांनी स्वतः जाऊन पहाणी करावी, या मागणीचे निवेदन माजी आमदार आणि हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.