सावळज येथे सर्पदंश झाल्याने विवाहितेचा मृत्यू !

प्रतिकात्मक छायाचित्र

तासगाव (जिल्हा सांगली) – तालुक्यातील सावळज येथे कावेरी प्रेम चव्हाण या विवाहितेला त्या झोपलेल्या असतांना नागाने दंश केल्याने तिचा मृत्यू झाला. गावातील रुग्णालयाला सुटी असल्याने स्थानिक पातळीवर उपचार मिळाले नाहीत. अखेर सांगली शासकीय रुग्णालयात आणेपर्यंत कावेरीचा मृत्यू झाला.