देहभान विसरून समष्टी सेवा करणार्या आणि तत्त्वनिष्ठता अन् प्रेमभाव यांचा सुरेख संगम असलेल्या पू. (सौ.) मनीषा महेश पाठक (वय ४३ वर्षे)!
पू. ताईंच्या प्रत्येक कृतीतून गुरुदेवांचेच दर्शन होते. त्यांच्या प्रत्येक कृतीतून त्यांचे साधकांवरील निरपेक्ष प्रेम आणि वात्सल्यभाव पहायला मिळतो. प्रत्येक साधकाला ‘गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवता आले पाहिजे’, असा पू. ताईंचा सतत प्रयत्न असतो.