Swami Sri Bharatarshabha Dasa : ‘अक्षयपात्र फाउंडेशन’कडून महाकुंभक्षेत्री प्रतिदिन ३० सहस्र भाविकांसाठी अन्नदान सेवा !

महाकुंभक्षेत्री येणार्‍या भाविकांना २ वेळचा शुद्ध महाप्रसाद मिळावा, त्यांना जेवणाची कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी ‘अक्षयपात्र फाउंडेशन’कडून महाकुंभक्षेत्री प्रतिदिन ३० सहस्र भाविकांसाठी अन्नदान सेवा करण्यात येत आहे.

Prayagraj Kumbh Parva 2025 : महाकुंभमेळ्यात हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या  फलकांना पोलिसांचा विरोध

हिंदु राष्ट्राचे फलक काही दिवसांपूर्वी काढतांना पोलीस प्रशासनाने समितीला पूर्वकल्पना का दिली नाही ? तसेच याचे कारणही दिले नाही. प्रखर हिंदुत्वनिष्ठ योगी आदित्यनाथ यांच्या प्रशासनात हिंदु राष्ट्रविरोधी मानसिकतेचे पोलीस असणे अपेक्षित नाही !

Shankaracharya Nischalanand Sarasvati : ईश्‍वर आणि ऋषीमुनी यांच्या संकेतावरून मी हिंदु राष्ट्राचा उद्घोष करतो !

सव्वातीन वर्षांपासून भारत हिंदु राष्ट्र व्हावे, असे मी म्हणत आहे. ईश्‍वर आणि ऋषीमुनी यांचा मला जो संदेश मिळतो, तो मी प्रसारित करत आहे, असे वक्तव्य पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांनी केले.

Mahant Balaknath Yogi : देशाला सक्षम राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे !

देशाची प्रगती झाली, तर संपूर्ण जग आपल्याकडे आकर्षित होईल. त्यामुळे आपण सर्वांनी देशाला एक सक्षम राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे वक्तव्य राजस्थानमधील भाजपचे आमदार तथा गोरक्षनाथ आखड्याचे महंत बालकनाथ योगी यांनी केले.

Prayagraj Mahakumbh Stampede : नियोजनातील अपरिपूर्णता आणि अतीआत्मविश्‍वास नडला !

महाकुंभपर्वात घडलेली चेंगराचेंगरीची घटना अत्यंत दर्दैवी आहे. यामध्ये निष्पाप भाविकांचा हाकनाक बळी गेला. या घटनेमागील नेमकी कारणे, प्रशासकीय त्रुटी आणि उपाय यांवर टाकलेला प्रकाश !

Mahakumbh Ayurvedic Treatment : प्रतिदिन ८०० हून अधिक रुग्णांवर नि:शुल्क आयुर्वेदिक उपचार !

महाकुंभपर्वात येणार्‍या कोट्यवधी भाविकांना आजारावर उपचार मिळावेत, यासाठी १० आयुर्वेद चिकित्सालय उभारण्यात आले आहेत. प्रत्येक चिकित्सालयात ३ वैद्यांसह अन्य ६ कर्मचारी कार्यरत आहेत. एका चिकित्सायलयात प्रतिदिन ८०० हून अधिक रुग्णांवर नि:शुल्क उपचार करण्यात येत आहेत.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : भारतगौरव

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २५ जानेवारीला दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

उड्डपी जिल्ह्यातील कोटेश्वर येथील श्रीमती लक्ष्मीदेवी पै (वय ८२ वर्षे ) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी

श्रीमती लक्ष्मीदेवी पै यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले, ‘‘प्रत्येक प्रसंगात भगवंत आमच्याकडून सर्वकाही करवून घेतो, अशी ठाम श्रद्धा असेल, तर सर्व काही शक्य आहे.’’

महाकुंभमेळा : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी २ सहस्रांहून अधिक धर्मयोद्धे सज्ज !

उत्तरप्रदेशातील कानपूर येथील ‘शिवशक्ती आखाड्या’च्या ३० हिंदुत्वनिष्ठांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी शस्त्रसज्ज संन्यास स्वीकारला आहे.यासह आखाड्याचे २ सहस्र २०० युवक शस्त्र प्रशिक्षित धर्मयोद्धे म्हणूनही सज्ज झाले आहेत.

कुंभमेळ्यात महिलांना कपडे पालटण्यासाठी असलेली आडोसा केंद्रे खालून दीड फूट उघडी !

महिलांना कपडे पालटतांना पूर्ण आडोसा द्यायला हवा, हे साधारण सूत्रही प्रशासनाच्या लक्षात आले नसल्याविषयी भाविकांकडून आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.