समंजस आणि इतरांना साहाय्‍य करणारे चि. संदेश नाणोसकर अन् हसतमुख आणि इतरांचा विचार करणार्‍या चि.सौ.कां. दीपाली माळी !

चि. संदेश नाणोसकर यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये

चि. संदेश नाणोसकर

१. सौ. स्‍मिता संजय नाणोसकर (चि. संदेशची आई), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

१ अ. काटकसरी : ‘संदेशने कधीही शाळेत जातांना पैसे मागितले नाहीत. त्‍याला काही पैसे दिल्‍यास तो प्रत्‍येक पैशाचा हिशोब देतो. एकदा तो सहलीला गेला होता. तो घरी आल्‍यावर मी त्‍याला विचारले, ‘‘तू काहीच घेतले नाहीस का ?’’ तेव्‍हा तो म्‍हणाला, ‘‘आपल्‍या घरात तर सगळं आहे. कशाला उगीच व्‍यय करायचा ?’’ तेव्‍हा मला त्‍याचे पुष्‍कळ कौतुक वाटले. तो प्रत्‍येक वस्‍तू विचारूनच घेतो.

१ आ. समजंस : त्‍याच्‍याकडून काही चुकल्‍यास किंवा कुणाला त्‍याच्‍याबद्दल काही वाटत असल्‍यास मी त्‍यांना सांगायचे, ‘‘तुम्‍ही त्‍याला शिक्षा देऊ शकता.’’ त्‍याने ‘माझे आई-बाबा मला शिक्षा न करता अन्‍य जणच मला शिक्षा करतात’, असे कधीच म्‍हटले नाही. तो शांतपणे शिक्षा पूर्ण करत असे.

१ इ. प्रेमभाव : कुणी त्‍याला काही दिले, उदा. एखाद्या संतांनी पेढा दिला, तरी तो अजूनही खोलीत आणून देतो आणि ‘‘संतांनी मला प्रसाद दिला आहे’’, असे सांगून तो आम्‍हा दोघांनाही देऊन नंतरच खातो. मी रुग्‍णाईत असतांना तो आम्हा दोघांनाही चहा आणि अल्पाहार खोलीत आणून देतो. मला वातामुळे त्रास होत असतांना तो मला सर्व प्रकारे साहाय्य करतो.

१ ई. स्‍वयंपाकाची आवड : त्‍याने लहान वयातच विविध खाद्यपदार्थ बनवणे शिकून घेतले आहे. त्याची आजी आणि काका त्याच्यावर प्रसन्न असतात.

१ ऊ. प.पू. गुरुमाऊलींप्रती भाव : चि. संदेश लहान असतांना एकदा प.पू. डॉक्‍टर (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमात आले होते. तेव्हा काही लहान मुले त्यांना भेटायला गेली. प.पू. डॉक्टरांनी संदेशला काही चॉकलेट्स द़िली आणि अन्य मुलांना द्यायला सांगितली. तेव्हा संदेश लहान होता. त्याने प्रत्येक मुलाच्या हातात एकेक चॉकलेट दिले आणि प.पू. डॉक्टरांच्याही हातात दिले. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी त्याला विचारले, ‘‘आधी तू चॉकलेट घ्यायला हवे होते. उरले नाही, तर तुला कुठले ?’’ तेव्हा तो हसला. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी त्याला २ चॉकलेट्स दिली. त्या वेळी त्याला पुष्कळ आनंद झाला. तो प.पू. डॉक्टरांनी दिलेला प्रसाद पुष्कळ द़िवस पुरवून खात असे. त्याची प.पू. डॉक्टरांवर पुष्कळ श्‍रद्धा आहे.’

२. श्री. संजय नाणोसकर  (चि. संदेश यांचे वडील, आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के, वय ५६ वर्षे)

२ अ. ऐकण्‍याची वृत्ती : ‘तो आम्ही सांगितल्यानुसार प्रामाणिकपणे कृती करतोे. त्याला काही अडचणी आल्यास तो आमच्याशी मोकळेपणाने बोलतो.

२ आ. पूर्णवेळ साधना करण्‍याची आवड : त्याचा शालेय शिक्षण घेण्यापेक्षा अध्यात्माकडे अधिक ओढा आहे. त्याला दहावीच्या परीक्षेत ८७ टक्के गुण मिळाले होते. त्याला शास्त्र शाखेत प्रवेश मिळाला होता. तो महाविद्यालयात गेल्यावर पहिल्याच दिवशी त्याने तेथील वातावरण पाहून पूर्णवेळ साधना करण्याचा विचार केला.

२ इ. तो संतांनी सांगितलेल्‍या सेवा भावपूर्ण करतो.’

३. श्रीमती रंजना जयदेव नाणोसकर (चि. संदेशची आजी, वडिलांची आई)

अ. ‘तो कधीच रागाने किंवा उद्धटपणे बोलला नाही.

आ. तो प्रत्‍येक सेवा परिपूर्ण करतो.’

४. श्री. संदीप नाणोसकर (चि. संदेश यांचे लहान काका) बांदा, जि. सिंधुदुर्ग

४ अ. आश्रमजीवनामुळे संदेशमधील गुण वृद्धींगत होणे : ‘गुरुमाऊलींच्‍या कृपेने संदेशला बालपणापासूनच आश्रमात रहाण्‍याचे भाग्‍य लाभले. त्‍याच्‍यामधील ‘संयम, अंतर्मुखता, पुढाकार घेणे, ऐकण्‍याची वृत्ती असणे’ आदी गुणांमुळे तो सर्वांचा लाडका आहे. संतांच्या कृपेमुळे संदेशमधील गुणांची वृद्धी होत आहे. गुरुमाऊलींनी आम्हा नाणोसकर कुटुंबियांवर केलेली ही अपार कृपाच असल्याची जाणीव या निमित्ताने दृढ होते.’

५. श्री. संतोष नाणोसकर (चि. संदेश यांचे लहान काका), बांदा, जि. सिंधुदुर्ग

अ. ‘संदेश नम्रतेने बोलतो. तो स्‍वतःचे मत मांडत असतांना त्‍याची कधीही आग्रही भूमिका नसते.

आ. ‘समाजात तुलना करणे आणि दुःखी होणे’, हे मोठ्या प्रमाणात दिसते. संदेश कधी असे करतांना दिसला नाही.’

६. सौ. शुभदा हरिश्‍चंद्र वेंगुर्लेकर (चि. संदेश यांची आत्‍या), कुडाळ

अ. ‘संदेश लहानपणापासूनच शांत, समजूतदार आणि काटकसरी आहे.

आ. संदेशने दहावीनंतर पूर्णवेळ साधना करण्‍याचा निर्णय घेतला. तेव्‍हा मला आनंद झाला. ‘आपल्‍या जीवनात अध्‍यात्‍माचे किती महत्त्व आहे’, हे त्‍या वयात समजणे, म्‍हणजे ‘तो किती विचारी आहे’, हे लक्षात येते. ‘तो करत असलेल्‍या साधनेचा त्‍याच्‍यावर खोल परिणाम झाला आहे’, हे त्‍याने वेळोवेळी कृतीतून दाखवून दिले आहे.’

७. श्री. हरिश्‍चंद्र बाबली वेंगुर्लेकर (चि. संदेश यांच्‍या आत्‍याचे यजमान), कुडाळ

अ. ‘तो बालपणापासूनच आश्रमात रहातो. तो आश्रमातून काही दिवसांसाठी घरी आल्‍यावरही आश्रमात असल्‍याप्रमाणेच रहातो. त्‍याच्‍या मनात ‘आश्रमातून घरी आलो आहे, तर मोकळेपणाने आणि ऐषारामात राहूया’, असा विचार कधी येत नाही.’

८. कु. प्रियांका वेंगुर्लेकर (चि. संदेशची आतेबहीण) आणि श्री. जयवंत हरिश्‍चंद्र वेंगुर्लेकर (चि. संदेशचा आतेभाऊ), कुडाळ

अ. ‘तो उत्‍साही आणि प्रेमळ आहे.

आ. तो नेहमीच दुसर्‍यांना साहाय्‍य करण्‍यास तत्‍पर असतो.’

९. सेवेशी संबंधित साधक

९ अ. ‘संदेशचे वागणे-बोलणे नम्र आहे.

९ आ. साधनेचा दृढ निश्‍चय : तो वयाच्‍या साडेतीन वर्षांपासून देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमात आई-वडिलांसमवेत रहात आहे. त्याला लहानपणापासूनच आश्रमात रहाण्याचे भाग्य लाभले. या संधीचा लाभ घेत त्याने पूर्णवेळ साधना करण्याचा आणि आश्रमात रहाण्याचा निर्धार केला आहे. ‘तरुण वयात असा निर्णय घेणे’, हेे पुष्कळ वैशिष्ट्यपूर्‍ण आहे.

९ इ. शिकण्‍याची वृत्ती : तो अन्‍य वृत्तपत्रांतील वृत्ते, तसेच लेख यांच्‍या संरचनेचा अभ्‍यास करतो आणि ‘सेवेमध्‍ये नावीन्‍य ठेवून काय प्रयत्न करू शकतो’, अशा दृष्‍टीने विचार अन् कृती करतो. त्‍याने संपादन केलेल्‍या कौशल्‍यामुळे त्‍याला दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या विशेषांकांमधील लिखाणाची आकर्षक रचना करणेही सहजसुलभ होते.

९ ई. नियोजनकौशल्‍य : संदेश कधीच वेळ वाया घालवत नाही. तो सेवेचे नियोजन करून त्‍याप्रमाणे सेवा करतो.

९ उ. इतरांना साहाय्‍य करणे : संदेशकडे साहाय्‍य मागितले, तर ‘तो निश्‍चित साहाय्‍य करणार’, असा विश्‍वास साधकांना वाटतो. त्‍यामुळे साधक त्‍याच्‍याकडे हक्‍काने साहाय्‍य मागतात.’

९ ऊ. अंतर्मुख : तो अंतर्मुख असल्‍याने त्‍याला स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या मुळाशी जाता येते. त्‍या अनुषंगाने त्‍याला सखोल चिंतन करणेही जमते. ‘स्‍वभावदोष आणि अहं यांचे कोणते पैलू कार्यरत आहेत’, हे तो नेमकेपणाने सांगू शकतो.’

________________________________________________

चि.सौ.कां. दीपाली माळी यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये

चि.सौ.कां. दीपाली माळी

१. ‘चि. दीपाली सतत हसतमुख असते. तिच्‍याकडे पाहिल्‍यावर इतरांनाही उत्‍साह वाटतो.

२. ती सर्वांशी प्रेमाने आणि नम्रतेने बोलते.

३. इतरांचा विचार करणे 

ती रुग्‍णाईत साधकांना वेळच्‍या वेळी जेवण देणे इत्‍यादी सेवा मनापासून करते. सर्वांनाच दीपालीचा आधार वाटतो.

४. तिच्‍या मनावर साधनेचे योग्‍य दृष्‍टीकोन बिंबले गेले आहेत.

५. पुढाकार घेऊन आणि झोकून देऊन सेवा करणे

अ. ती स्‍वयंपाकघरातील नवीन सेवा शिकून घेते आणि त्‍या सेवा पुढाकार घेऊन करते.

आ. तिला कधीही कोणतीही सेवा सांगितली, तरीही तिची ती सेवा करण्‍याची सिद्धता असते. तिची सेवेत आवड-नावड नसते.

इ. ती झोकून देऊन सेवा करते. काही मासांपूर्वी सेवेतील उत्तरदायी साधिका अनुपस्‍थित होती. त्‍या वेळी तिने अल्‍प साधकसंख्‍या असतांनाही सर्व सेवा दायित्‍वाने पार पाडल्‍या.

६. मायेची ओढ अल्‍प असणे

ती वर्षातून एकदा दिवाळीच्‍या कालावधीत घरी जाते. ती घरी जातांना आश्रमात परत येण्याचा दिनांक निश्चित करून जाते आणि त्याच दिवशी ती आश्रमात येते. तिला घरी जाण्याची, तेथे रहाण्याची ओढ अल्प आहे.

७. संतांप्रती भाव

दीपालीमध्‍ये गुरु आणि संत यांच्‍याप्रती भाव अन् दृढ श्रद्धा आहे. ती संतांनी सांगितलेले मनापासून ऐकते आणि त्याप्रमाणे कृती करते.

‘चि. दीपाली पुढील जीवनातही अशीच सर्वगुणसंपन्‍न होवो. तिची साधनेत प्रगती होऊन ती गुरुचरणांशी एकरूप होवो’, अशी गुरुचरणी प्रार्थना ! ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आम्हाला स्वयंपाकघरात अशा गुणी साधिकेच्या समवेत सेवा करण्याची संधी दिली’, याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’

– सेवेशी संबंधित साधक

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ३०.१.२०२५)