‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्यावर आणि सनातनची सात्त्विक उत्पादने वापरल्यावर समुपदेशकाकडे येणार्‍या जोडप्यांनी घटस्फोट घेण्याचा विचार रहित करणे 

‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्यावर आणि सनातनची सात्त्विक उत्पादने वापरल्यामुळे समुपदेशकाकडे येणार्‍या जोडप्यांचे घटस्फोट घेण्याचे प्रमाण अल्प झाल्याचे माझ्या लक्षात आले. या संदर्भातील प्रसंग येथे दिला आहे.

१ ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्यावर समुपदेशकाकडे येणार्‍या ७० टक्के जोडप्यांचे घटस्फोट न होणे

१ अ. एका समुपदेशकांकडे साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार करण्यासाठी जाणे आणि त्यांच्याकडे घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलेली काही जोडपी येणे अन् त्यांना समजावून सांगितल्यावरही बर्‍याच जणांनी घटस्फोट घेणे : ‘मी आणि माझे यजमान आधुनिक पशूवैद्य अजय जोशी (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ६९ वर्षे) अध्यात्माचा प्रचार करत असतांना एका समुपदेशकांकडे त्यांना साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार करण्यासाठी आणि साधनेसंबंधी सांगण्यासाठी गेलो होतो. त्या समुपदेशकांकडे घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलेली काही जोडपी येत असत. त्या समुपदेशक त्यांच्याकडे आलेल्या जोडप्यांना ‘काही सूत्रे सांगून एकत्र राहून बघा आणि मासाभराने पुन्हा या’, असे सांगायच्या, पण तरीही बरेच जण घटस्फोट घेत असत.

१ आ. समुपदेशकांनी जोडप्यांना ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करण्यास सांगितल्यावर १ मासानंतर ७० टक्के जोडप्यांचे घटस्फोट रहित होणे : आम्ही त्या समुपदेशकांना सांगितले, ‘‘एखादे जोडपे घटस्फोट घेण्यामागे पूर्वजांच्या त्रासाचे कारण सते, तसेच त्या जोडप्याने ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्याने घटस्फोट होणे टळू शकते. तुम्ही तुमच्याकडे येणार्‍या प्रत्येक जोडप्याला किमान तीन माळा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करण्यास सांगा. त्यानंतर ‘एक मासाने घटस्फोट घेणार्‍या जोडप्याला बोलावल्यावर काय परिणाम होतो’, हे तुम्हाला अनुभवता येईल.’’ त्यांनी तो प्रयोग त्वरित कृतीत आणला. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले, ‘त्यांच्याकडे येणार्‍या १०० टक्के लोकांपैकी ७० टक्के जोडप्यांचे घटस्फोट झाले नाहीत. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी सांगितलेली साधना किती उच्च प्रतीची आणि परिणामकारक आहे !’, हे माझ्या लक्षात आले.

२. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ नामजपासह सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादनांचा वापर करण्यास सांगितल्यावर घटस्फोटाचा विचार सोडून जोडपी पुन्हा एकत्र येणे

२ अ. समुपदेशकांनी घटस्फोट घेण्यासाठी येणार्‍या जोडप्यांना नामजप करायला सांगण्यासह सनातन-निर्मित अत्तर आणि कापूर यांचा वापर करण्यास सांगितल्यावर जोडप्यांच्या मनातील टोकाचे विचार नाहीसे होऊन ते पुन्हा एकत्र येणे : मुंबईतील एका साधिकेची बहीण समुपदेशक होती. तिचाही अनुभव अशाच प्रकारचा आहे. त्या त्यांच्याकडे घटस्फोट घेण्यासाठी येणार्‍या जोडप्यांना ‘श्री गुरुदेव दत्त ।’ असा नामजप करायला सांगण्यासह सनातन-निर्मित अत्तर आणि कापूर बाहेर जातांना लावा’, असे सांगत असत. त्यामुळे त्या जोडप्यांच्या मनावर बाहेरील रज-तमात्मक वातावरणाचा परिणाम अल्प होऊन त्यांच्या मनातील टोकाचे विचार नाहीसे होऊन ते पुन्हा एकत्र येत असत.

‘श्रीकृष्णार्पणमस्तु’

– सौ. अंजली अजय जोशी (वय ६२ वर्षे), ढवळी, फोंडा, गोवा. (२१.१.२०२५)

सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ‘सनातन प्रभात’ यांचा समाजाला लाभ होत असल्याची उदाहरणे

१.  चैतन्यदायी ‘सनातन प्रभात’ वाचून कुलदेवीचे दर्शन घेण्याचे महत्त्व लक्षात येणे

सौ. अंजली जोशी

एका महिला समुपदेशकांनी इंग्रजी पाक्षिक ‘सनातन प्रभात’चालू केले. ते पाक्षिक त्यांचे यजमान वाचायचे. आम्ही १ वर्षानंतर ‘सनातन प्रभात’चे नूतनीकरण करण्यासाठी त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘मी ७२ वर्षांचा आहे. आजपर्यंत मी कधीही माझ्या कुलदेवतेच्या दर्शनाला गेलो नाही; परंतु ‘सनातन प्रभात’ वाचून आयुष्यात पहिल्यांदाच मी कुलदेवीचे दर्शन घेण्यासाठी जाऊन आलो.’’ तेव्हा ‘प.पू. डॉक्टरांनी निर्माण केलेले चैतन्यमय ‘सनातन प्रभात’ हे नियतकालिक समाजात किती पालट घडवून आणू शकते !’, हे माझ्या लक्षात आले.

२. साधिकेने यजमानांच्या गणवेशाला अत्तर आणि कापूर लावणे, त्यांचे यजमान कार्यालयात गेल्यावर तेथील पोलीस अधिकार्‍यांना अत्तराचा सुगंध आवडणे, त्यांनीही सनातनचे अत्तर अन् कापूर यांची मागणी करणे

मी पुण्यामध्ये घेत असलेल्या सत्संगात एक साधिका यायच्या. त्यांचे यजमान पोलीस होते. ते कार्यालयात जातांना त्या साधिका यजमानांच्या गणवेशाला अत्तर आणि कापूर लावून ठेवायच्या. त्या सुगंधामुळे तेथील अधिकारी त्यांना विचारत असत, ‘‘तुमच्या गणवेशाला वेगळाच सुगंध येतो. तुम्ही काय लावता ?’’ तेव्हा त्या पोलिसाने त्यांच्या अधिकार्‍यांना सनातन-निर्मित अत्तर आणि कापूर यांच्या लाभाविषयी सांगितले. ते ऐकून त्या अधिकार्‍यांनीसुद्धा सनातनचे अत्तर आणि कापूर यांची मागणी केली. तेव्हा ‘सनातन- निर्मित आध्यात्मिक उपाय साहित्याचे महत्त्व किती आहे आणि समाजाला त्याचा किती लाभ होत आहे’, हे माझ्या लक्षात आले.’

– सौ. अंजली अजय जोशी (वय ६२ वर्षे), ढवळी, फोंडा, गोवा. (२१.१.२०२५)