(म्‍हणे) ‘संभाजी भिडेंचे पाय तोडल्‍यास २ लाख रुपये देणार !’

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे संस्‍थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी  म. गांधी यांच्‍याविषयी अवमान करणारे वक्‍तव्‍य केल्‍याचा काँग्रेसने आरोप केला आहे. त्‍यांच्‍या वक्‍तव्‍याचा निषेध करण्‍यासाठी एम्.आय.एम्. पक्षाचे शहराध्‍यक्ष फारुख शाब्‍दी यांच्‍या नेतृत्‍वाखाली निदर्शने करण्‍यात आली.

सोलापूर येथे पू. भिडेगुरुजींच्‍या समर्थनार्थ रस्‍त्‍यावर उतरलेल्‍या हिंदुत्‍वनिष्‍ठांवर पोलिसांचा अमानुष लाठीमार !

पू. भिडेगुरुजी यांच्‍या समर्थनार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दुग्‍धाभिषेक आंदोलन करण्‍याचा निर्णय श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानने घोषित केला होता. पोलिसांनी या आंदोलनाला अनुमती नाकारली. नियोजित आंदोलनानुसार श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे धारकरी चौकामध्‍ये उपस्‍थित राहिले असता फौजदार चावडी पोलिसांनी काही धारकर्‍यांना कह्यात घेतले.

पू. भिडेगुरुजींच्‍या व्‍याख्‍यानाचे फलक आणि भगवे ध्‍वज यांची समाजकंटकांकडून हानी !

कार्यक्रम प्रारंभ होण्‍याच्‍या काही घंट्यांपूर्वी काही समाजकंटकांनी ते फलक फाडून भगव्‍या ध्‍वजांना क्षतिग्रस्‍त केले. या संदर्भात हिंदुत्‍वनिष्‍ठांनी पोलिसांना संबंधितांवर कारवाई करण्‍याविषयी निवेदन दिले.

आमदार यशोमती ठाकूर, पृथ्‍वीराज चव्‍हाण, जितेंद्र आव्‍हाड यांना निलंबित करा !

पू. गुरुजींवर खोटे आरोप करणे, राज्‍यघटनेचा अपमान करणे, राज्‍यामध्‍ये शांतता-सुव्‍यवस्‍था बिघडवणे या आरोपांखाली वरील तीनही आमदारांचे सदस्‍यत्‍व कायमस्‍वरूपी निलंबित करण्‍यात यावे, असेही त्‍यांनी तक्रारीत म्‍हटले आहे.

पू. भिडेगुरुजी यांच्यावरील कारवाईसाठी विधानसभेत विरोधकांचा पुन्हा गदारोळ !

‘राष्ट्रीय नेत्याविषयी कुणीही अवमानकारक वक्तव्य केल्यास कारवाई केली जाईल. वीर सावरकरांवरही काँग्रेसचे मुखपत्र ‘शिदोरी’ मध्ये ‘माफीवीर’ आणि समलैंगिक असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणीही गुन्हा नोंदवण्यात येईल – देवेंद्र फडणवीस

काँग्रेस पक्षाच्या ‘जनमानसातील शिदोरी’ मुखपत्रावर कारवाई करणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री

या मुखपत्रकात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे माफीवीर होते, समलैंगिक होते, सावरकर स्वातंत्र्यलढ्यात उतरले नाहीत’, अशा अनेक आक्षेपार्ह गोष्टी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.

यापुढे ‘जशास-तसे’ प्रत्युत्तर देऊ ! – सागर आमले, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

प्रशासनाने वेळीच अशा गैरकृत्य करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा यापुढे ‘जशास-तसे’ प्रत्युत्तर देण्यात येईल, अशी चेतावणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कराड-पाटण तालुक्याचे कार्यवाह श्री. सागर आमले यांनी दिली.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्‍या समर्थनार्थ सकल हिंदु समाज रस्‍त्‍यावर !

शिवतीर्थावर (पोवई नाक्‍यावर) पू. गुरुजींच्‍या समर्थनार्थ आंदोलन करण्‍यात आले. या प्रसंगी शेकडो हिंदूंच्‍या उपस्‍थितीत पू. गुरुजींच्‍या प्रतिमेला दुग्‍धाभिषेक करण्‍यात आला. नंतर जिल्‍हा प्रशासनाला निषेध निवेदन देण्‍यात आले.

ठाणे येथे पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद !

नौपाडा पोलीस ठाणे गुन्‍हा नोंदवून घेत नाही, तोपर्यंत राष्‍ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते येथे ठाण मांडून बसले होते. काही काळ पोलिसांसमवेत चर्चा करून पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी केलेल्‍या वक्‍तव्‍याविषयी ठाणे येथे गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे.

बंदी नसलेल्या पुस्तकातील लिखाण वाचून दाखवणे कायद्याने गुन्हा ठरत नाही ! – अजय सिंह सेंगर, महाराष्ट्र प्रमुख, करणी सेना

पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवल्याच्या प्रकरणी त्यांनी हे मत व्यक्त केले. गांधींचा एवढा पुळका होता, तर काँग्रेसने या पुस्तकावर बंदी का घातली नाही ?, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.