
पुणे – नगर रस्त्यावरील मांजरी कोलवडी गावात माऊली लॉन्स येथे २ सप्टेंबर या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त ठेवला होता. अनुमती नाकारल्यानंतरही सभेचे आयोजन केल्याप्रकरणी पू. संभाजी भिडेगुरुजी, राजेंद्र आव्हाळे, राहुल उंद्रे, बाळासाहेब नेवाळे यांच्यासह १५० जणांविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलीस कर्मचारी रितेश नाळे यांनी या संदर्भात लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
पुणे महानगरपालिकेत बनावट नियुक्तीपत्रांच्या माध्यमांतून आर्थिक फसवणूक !
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण
प्रश्नपत्रिका फुटीचे सरकार दायित्व घेते आणि ते निश्चितही करते ! – सचिंद्र प्रताप सिंह, शिक्षण आयुक्त