जालना – जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी म्हणून मंत्री संदीपान भुमरे आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर उपोषणस्थळी गेले. त्यांची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा चालू असतांनाच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी हे उपोषणस्थळी आले. मनोज जरांगे यांचे उपोषण स्तुत्य आणि योग्य आहे; पण मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे बेईमानी करणार नाहीत. ही लढाई ‘एक घाव, दोन तुकडे’ अशी नाही. त्यामुळे हे उपोषण थांबवा, अशी विनंती पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी मनोज जरांगे यांना केली आहे.
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी हे उपोषणकर्त्या मनोज जरांगे पाटील यांना काय म्हणाले?👇
“मी आज आलोय ज्ञानोबा-तुकोबा, संत एकनाथ, सावता माळी, गोरा कुंभार, पांडुरंग, विठ्ठल रखुमाई यांचा निरोप घेऊन, राजकारणी माणसांनी रागवू नका, तुम्ही राजकारणी नाही..… pic.twitter.com/Wdvr5WTekZ
— पवन/Pawan 🇮🇳 (@ThePawanUpdates) September 12, 2023
पू. भिडेगुरुजी पुढे म्हणाले, ‘‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे आणि ते १०० टक्के मिळणार आहे. मी आणि माझे सर्व सहकारी या आंदोलनासमवेत आहोत. श्री शिवप्रतिष्ठान तुमच्या पाठीशी आहे.’’