मुंबईत साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’च्‍या वर्धापनदिनी ‘वॉल मॅग्‍झिन’वर वाचकांनी नोंदवले अभिप्राय !

‘सनातन प्रभात’ ‘घरोघरी ‘सनातन प्रभात’ असायला हवा’, ‘वृत्तपत्र नव्‍हे, सर्वांचा परममित्र’, ‘सनातन प्रभातमुळे मुलांवर धर्मसंस्‍कार, धर्माचरण यांचे संस्‍कार झाले’, ‘अतिशय छान’, ‘हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करण्‍याचे ध्‍येय’, ‘भक्‍त आणि भगवंत यांमधील दूत’ अशा शब्‍दांत वाचकांनी ‘सनातन प्रभात’विषयी अभिप्राय नोंदवला.

राष्‍ट्र आणि धर्म यांसाठी कार्यरत असणारे एकमेव वृत्तपत्र म्‍हणजे ‘सनातन प्रभात’ होय ! – अधिवक्‍ता समीर पटवर्धन

सनातन प्रभातचे वाचक हे केवळ वाचक नसून तो भगवंताशी जोडलेला जीव आहे. राष्‍ट्र-धर्म यांसाठी कार्यरत असणारे एकमेव वृत्तपत्र म्‍हणजे सनातन प्रभात होय, असे प्रतिपादन अधिवक्‍ता समीर पटवर्धन यांनी केले.

‘सनातन प्रभात’ हेच सनातन हिंदु धर्माचे खरे मुखपत्र ! – हनुमंत कारेकर, विश्‍वस्‍त, रामदिघी मंदिर, चिमूर

हिंदु धर्माच्‍या पुनर्स्‍थापनेसाठी ‘सनातन प्रभात’चे योगदान मोठे आहे. त्‍यामुळे ते सनातन धर्माचे खरे मुखपत्र आहे, असे विचार चिमूर येथील रामदिघी मंदिराचे विश्‍वस्‍त तथा साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. हनुमंत कारेकर यांनी व्‍यक्‍त केले. १९ ऑगस्‍ट या दिवशी येथे साप्‍ताहित ‘सनातन प्रभात’चा रौप्‍य महोत्‍सवी वर्धापनदिन सोहळा आयोजित करण्‍यात आला होता.

अडीच दशके ‘सनातन प्रभात’चे समाज घडवण्याचे कार्य उल्लेखनीय ! – दुर्गेश परूळकर, ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते

साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा

सनातनचा हात धरा म्हणजे कुणाचेही पाय धरण्याची वेळ येणार नाही ! – विद्याधर नारगोलकर, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान

साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन सोहळा पुणे येथे उत्साहात साजरा !

‘सनातन प्रभात’मधील लिखाण म्‍हणजे आम्‍ही धर्मगुरूंचा आदेशच समजतो ! – अधिवक्‍ता दत्तात्रय सणस

वर्ष १९९८ पासून ‘सनातन प्रभात’ची वाटचाल चालू आहे. आज ‘साप्‍ताहिक सनातन प्रभात’ला २५ वर्षे पूर्ण होत असून आपण रौप्‍य महोत्‍सवी वर्ष साजरे करत आहोत.

हिंदूंवरील अत्याचार ठळकपणे मांडणे, हेच ‘सनातन प्रभात’चे वैशिष्ट्य ! – वेदमूर्ती भूषण जोशी, वेंगुर्ला

‘सनातन प्रभात’चे वैशिष्ट्य हेच आहे की, ते हिंदूंवरील अत्याचार ठळकपणे जगासमोर आणते, तर इतर माध्यमे अशा बातम्या दडपतात, असे गौरवोद्गार वेंगुर्ला येथील वेदमूर्ती भूषण जोशी यांनी ‘सनातन प्रभात’विषयी काढले !