पुणे येथे पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्‍या विरोधात तक्रार प्रविष्‍ट !

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे संस्‍थापक अध्‍यक्ष पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्‍यावर गुन्‍हा नोंद करून कारवाई करण्‍यात यावी, अशी तक्रार डेक्‍कन पोलीस ठाण्‍यामध्‍ये महात्‍मा गांधी यांचे पणतूू तुषार गांधी यांनी केली आहे.

पू. संभाजी भिडेगुरुजी यांची अपकीर्ती न थांबल्‍यास राज्‍यव्‍यापी आंदोलन करू ! – सकल हिंदु समाज, कोल्‍हापूर

अमरावती येथील सभेत पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी एका धारकर्‍याला ‘द कुराण अँड द काफीर’ या पुस्‍तकातील उतारा वाचण्‍यास सांगितला होता. काँग्रेस सरकारच्‍या काळात प्रकाशित झालेले हे पुस्‍तक आहे. असे असतांना विधानसभेत आणि राज्‍यभर काँग्रेस, पुरोगामी, डावे अकारण पू. भिडेगुरुजी यांच्‍यावर खोटे आरोप करून त्‍यांची अपकीर्ती करत आहेत, आंदोलन करत आहेत.

पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्‍या विरोधात पनवेल येथे गुन्‍हा नोंद

यांनी गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्‍मा जोतिबा फुले आणि पेरीयार नाईकर यांच्‍याविषयी आक्षेपार्ह वक्‍तव्‍य केल्‍याचा आरोप करून अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

पू. भिडेगुरुजींच्‍या समर्थनार्थ जळगावातील हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना एकवटल्‍या !

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे संस्‍थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्‍या वक्‍तव्‍याच्‍या विरोधात घडणार्‍या घटनांच्‍या निषेधार्थ जळगाव जिल्‍ह्यातील समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांनी जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन देऊन या गैरप्रकाराचा तीव्र निषेध केला.

पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्‍या समर्थनार्थ भोर येथे सकल हिंदु समाजाच्‍या वतीने सन्‍मान मोर्चा !

मूठभर लोकच गुरुजींच्‍या विरोधात असून सकल हिंदु समाज पू. भिडेगुरुजी यांच्‍या पाठीशी आहे, हे सांगण्‍यासाठी सकल हिंदु समाजाच्‍या वतीने शिवतीर्थ, चौपाटी, भोर येथे पू. भिडेगुरुजी यांच्‍या समर्थनार्थ सन्‍मान मोर्चाचे आयोजन करण्‍यात आले होते.

गांधीजींच्‍या अवमान याचिकेतून पू. भिडेगुरुजी यांचे नाव वगळण्‍याचे मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे निर्देश !

‘महापुरुषांविषयी वादग्रस्‍त वक्‍तव्‍ये केल्‍याची अनेक प्रकरणे असतांना केवळ संभाजी भिडे यांच्‍या विरोधात जनहित याचिका का ?’ असा प्रश्‍नही या वेळी मुख्‍य न्‍यायमूर्ती देवेंद्र उपाध्‍याय यांनी उपस्‍थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ष २०२४ च्‍या निवडणुकीत ३२५ ते ३५० जागा जिंकून परत विजयी होतील ! – भाऊ तोरसेकर

मिरज, ६ ऑगस्‍ट (वार्ता.) – एकमेकांचे विचारही न पटणारे डावे आणि पुरोगामी यांनी एकत्र येऊन एक आघाडी सिद्ध केली आहे; मात्र कुणाकडेही देशहिताचा विचार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याकडे देशविकासाची दृष्‍टी असून त्‍यांच्‍या नेतृत्‍वात भारत जागतिक स्‍तरावर पुढे आहे. लोकांनाही देश चालवण्‍यासाठी सक्षम नेतृत्‍व हवे असल्‍याने नरेंद्र मोदी वर्ष २०२४ च्‍या लोकसभा निवडणुकीत ३२५ ते … Read more

पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या समर्थनार्थ पलूस (जिल्हा सांगली) येथे मोर्चा !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या समर्थनार्थ पलूस येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पलूस बसस्थानकापासून चालू झालेला मोर्चा शिवतीर्थावर समाप्त झाला.

पू. भिडेगुरुजींची अपकीर्ती करणार्‍यांवर कारवाई करण्याची समर्थकांची पुणे जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे मागणी !

पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या समर्थनार्थ ५ ऑगस्ट या दिवशी बालगंधर्व चौकामध्ये दुग्धाभिषेक करण्यात येणार होता. त्यासाठी त्यांच्या समर्थकांनी पोलिसांकडे अनुमती मागितली होती; परंतु पोलिसांनी अमित शाह यांच्या दौर्‍याचे कारण देत ही अनुमती नाकारली आहे.

मोहनदास करमचंद गांधींना समजून घेतांना….

काही दिवसांपूर्वी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी ‘मोहनदास गांधी यांचे वडील मुसलमान जमीनदार होते’, असे विधान केल्याचे आरोप करण्यात आले. या‍वरून पू. भिडेगुरुजी यांना अटक करण्याची मागणी काँग्रेस अन् अन्य राजकीय पक्ष करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर गांधी यांच्या लांगूलचालनाच्या भूमिकेमुळे राष्ट्राच्या होत असलेल्या हानीविषयीचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.