केरळ उच्च न्यायालयाने स्वतःहून नोंद घेऊन कार्यवाही
थिरूवनंतपूरम् – केरळ उच्च न्यायालयाने मंडला-मकरविलक्कू उत्सवाच्या कालावधीत शबरीमला मंदिरातील तीर्थयात्रेकरूंच्या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. न्यायमूर्ती अनिल के. नरेंद्रन् आणि न्यायमूर्ती जी. गिरीश यांच्या खंडपिठाने याविषयी निर्देश दिले आहेत. या उत्सवाच्या वेळी होणार्या गर्दी आणि त्याचे व्यवस्थापन करण्याविषयी न्यायालयाने स्वतःहून नोंद घेतली होती.
न्यायालयाची काही मार्गदर्शक तत्त्वे !
१. मुख्य पोलीस समन्वयक तीर्थयात्रेकरूंच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड न करता पथिनेत्तमपाडी मार्गे येणार्या यात्रेकरूंच्या हालचालींचे नियमन करतील आणि पथिनेत्तमपाडी मार्गे अधिकाधिक भाविकांना दर्शन सुनिश्चित करतील.
२. महिला, अल्पवयीन मुले आणि अपंग व्यक्ती यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विशेष रांगांचे नियोजन केले जाईल.
३. त्रावणकोर देवस्वम् बोर्डचे ७२ कर्मचारी तैनात करून रांगांचा परिसर आणि यात्रेकरू निवास यांची स्वच्छता सुनिश्चित करतील. कार्यकारी दंडाधिकारी स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी रांगांचा परिसर आणि यात्रेकरू निवास यांची तपासणी करतील.
४. त्रावणकोर देवस्वम् बोर्ड वाहने व्यवस्थित उभी करण्यासाठी वाहनतळ क्षेत्रात पुरेसे सुरक्षा कर्मचारी तैनात करील.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या मंदिरांमधील प्रथा-परंपरा मोडित काढण्यासाठी, तेथील अर्पणावर डल्ला मारण्यासाठी पुढे असणारे केरळमधील साम्यवादी सरकार हिंदूंच्या मंदिरांमधील गर्दीचे व्यवस्थापन करण्याकडे दुर्लक्ष करते, हे जाणा ! न्यायालयाला याविषयी निर्देश द्यावे लागतात, हे सरकारला लज्जास्पद ! |