चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन हाकत असल्याचे उघड : अपघाताचे गोवा विधानसभेत पडसाद

या भीषण अपघाताच्या प्रकरणी संशयित परेश सिनाय सावर्डेकर याच्या विरोधात सदोष मनुष्यवध, निष्काळजीपणे वाहन हाकणे, वैयक्तिक आणि दुसर्‍याची सुरक्षितता धोक्यात आणणे, तसेच मद्यप्राशन करून वाहन चालवणे या आरोपांखाली गुन्हा नोंदवला आहे.

वर्सोवा (मुंबई) समुद्रात बोट बुडून २ जण बेपत्ता !

मुंबई शहरातील वर्सोवा येथील समुद्रात मासेमारीसाठी गेलेली एक बोट ५ ऑगस्‍टच्‍या रात्री ९.३० वाजता बुडाली. बोटीत ३ जण होते. त्‍यातील एकाने पोहत समुद्रकिनारा गाठला आहे. अद्याप दोघांचा शोध लागलेला नाही.

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणार्‍यांवर कारवाई करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

भाजपचे आमदार दिगंबर कामत यांनी राज्यात वाढत्या अपघाताला अनुसरून ‘सरकार अपघात टाळण्यासाठी कोणती उपाययोजना करणार ?’ याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.

समृद्धी महामार्गावर १०-१५ मिनिटांत रुग्णवाहिका पोचण्याची व्यवस्था करणार ! – दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम विभाग

समृद्धी महामार्गावर आतापर्यंत १०९ अपघात झाले आहेत. अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.

पुणे येथे ‘बी.आर्.टी.’ मार्गांवर बसगाड्यांची धडक !

चालकासह २९ प्रवासी किरकोळ घायाळ झाले आहेत. त्‍यांच्‍यावर ससून सर्वोपचार रुग्‍णालयामध्‍ये उपचार करण्‍यात आले. त्‍यामध्‍ये कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

ठाणे येथे समृद्धी महामार्गावर पुलाचे बांधकाम कोसळून १७ कामगारांचा मृत्यू !

समृद्धी महामार्गावर येथील शहापूरमधील सरंळाबे येथे पुलाचे बांधकाम कोसळून १७ कामगारांचा मृत्यू झाला. क्रेनद्वारे काम चालू असतांना क्रेन आणि गर्डर दोन्ही कोसळले.

सेल्‍फी काढतांना नदीत पडून वाहून जाणार्‍या महिलेला वाचवले !

सेल्‍फी काढतांना एक महिला पाय घसरून नदीत पडली. ती वाहून जात होती; पण तेथे असलेल्‍या डहाणू पंचायत समितीच्‍या उपसभापतीने वेळीच नदीत उडी मारून महिलेचा जीव वाचवला.

यवतमाळ येथे महामार्गावर भीषण अपघात !

नागपूर – तुळजापूर राष्‍ट्रीय मार्गावर वाहनांची तपासणी करणार्‍या महामार्ग पोलिसांच्‍या वाहनाला आयशर ट्रकने जोरदार धडक दिली.

ठाणे येथे टी.एम्.टी.च्‍या बसगाडीला आग; ५० प्रवाशांची सुटका !

स्‍थानिक रहिवासी आणि महानगरपालिकेचे कर्मचारी यांच्‍या साहाय्‍याने ५० प्रवाशांना बसगाडीच्‍या मागील दरवाज्‍यातून सुखरूप बाहेर काढण्‍यात आले.