अमेरिकेतील १२ खासदारांकडून ‘डाऊ केमिकल’ आस्थापनेवर कारवाईची मागणी

भोपाळ वायू दुर्घटनेचे सूत्र अमेरिकेत पुन्हा उपस्थित !

भोपाळमधील ‘युनियन कार्बाइड’ प्रकल्प (संग्रहित छायाचित्र)

भोपाळ – भोपाळ वायू दुर्घटनेचचे सूत्र अमेरिकेत पुन्हा उपस्थित झाले आहे. अमेरिकेतील १२ खासदारांनी देशाच्या न्याय विभागाला पत्र लिहून ‘डाऊ केमिकल’ या आस्थापनावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. या आस्थापनेच्या मालकीच्या भोपाळमधील ‘युनियन कार्बाइड’ प्रकल्पामध्ये वर्ष १९८४ मध्ये विषारी वायूची गळती होऊन शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता आणि सहस्रावधी लोकांना कायमचे अपंगत्व आले होते.

या दुर्घटनेच्या फौजदारी खटल्याची सुनावणी भोपाळ न्यायालयात चालू आहे. न्यायालयाने डाऊ केमिकल आस्थापनेला न्यायालयात उपस्थित रहाण्यासाठी आणि खटल्याला सामोरे जाण्यासाठी ७ समन्स पाठवले आहेत; पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ७ व्या समन्समध्ये पुन्हा एकदा आस्थापनाच्या अधिकार्‍यांना ४ ऑक्टोबरला न्यायालयात उपस्थित रहाण्यास सांगितले आहे.

संपादकीय भूमिका

भारतातील किती खासदारांनी संसदेत अशी मागणी केली आहे ?