चीनची आण्विक पाणबुडी बुडाल्याची चर्चा !

चीनकडून दुर्घटना लपवण्याचा प्रयत्न

बीजिंग (चीन) – चीनचे संरक्षणमंत्री ली शांगफू गेल्या २ आठवड्यांपासून बेपत्ता आहेत. ऑगस्ट मासामध्ये चीनची आण्विक पाणबुडी तैवान येथील समुद्रात झालेल्या अपघातात बुडाली. यात १०० नौसैनिक होते. त्यांचा मृत्यू झाला. याविषयी चीनने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. चीन ही दुर्घटना दडपत आहे, असे म्हटले जात आहे. याच घटनेमुळे संरक्षणमंत्री ली शांगफू बेपत्ता झाले असल्याची चर्चा होत आहे.

अमेरिकेने म्हटले आहे की, चीनच्या संरक्षणमंत्र्यांची चौकशी चालू आहे. त्यांच्याकडील सर्व दायित्व काढून घेण्यात आले आहे. या घटनेतून चीनच्या कम्युनिस्ट पक्षामध्ये गडबड आहे, असे निदर्शनास येतेे.