वाडा महामार्गावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघाती मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा नोंद

भिवंडी येथील वाडा महामार्गावर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीवरून जातांना तोल जाऊन पडल्याने आकाश जाधव (वय २२ वर्षे) या तरुणाचा ३१ ॲागस्टला अपघात होऊन मृत्यू झाला होता.

मुंब्रा येथील बाह्यवळण रस्त्यावर रसायन नेणारा टँकर उलटला !

टँकरमध्ये २५ टन सल्फ्युरिक ॲसिड होते. टँकरमधून रसायनाचा धूर आणि उग्र वास येत होता. टेक्नोव्हा आस्थापनाचे तज्ञ, अग्नीशमनदलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापनाचे पथक यांनी घटनास्थळी पोचून तात्काळ बचावकार्य केले.

पुण्‍यात दहीहंडीसाठीच्‍या ध्‍वनीवर्धक व्‍यवस्‍थेचे ‘स्‍टेज’ कोसळले !

पांगळु आळी येथे श्रीकृष्‍ण मंडळाच्‍या दहीहंडीसाठी ध्‍वनीवर्धक व्‍यवस्‍था उभारत असतांना दुचाकीचा धक्‍का लागून ‘स्‍टेज’ कोसळले.

गोवा : म्हार्दोळ पोलीस निरीक्षकांचे प्राथमिक अन्वेषण करण्याचा पोलीस महासंचालकांचा आदेश

‘या घटनेत पुरावे नष्ट केले, चुकीची माहिती दिली, मुख्य आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आदी सर्व प्रकार म्हार्दोळ पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांच्या उपस्थितीत झाले, तरीही पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही.’ उच्च न्यायालयाच्या या टिपणीनंतर पोलिसांनी आदेश दिला आहे.

पीडितांच्या हानीभरपाईचे दावे ६ मासांत निकाली काढण्याचा उच्च न्यायालयाचा लवादाला आदेश

बाणस्तारी येथील अपघातामध्ये मृत झालेले आणि घायाळ झालेले यांच्या कुटुंबियांना हानीभरपाई मिळण्याविषयीचे दावे पुढील ६ मासांत निकाली काढावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मोटर अपघात दाव्यांविषयीच्या लवादाला दिला आहे.

शहरात मोकाट गुरे सोडल्‍यास संबंधितांवर दंडात्‍मक कारवाई करणार ! – अभिजित बापट, मुख्‍याधिकारी, सातारा नगरपालिका

पाळीव गुरांच्‍या मालकांनी शहरामध्‍ये मोकाट गुरे सोडल्‍यास त्‍यांच्‍यावर कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, अशी माहिती सातारा नगरपालिकेचे मुख्‍याधिकारी अभिजित बापट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

अंबरनाथ येथे इमारतीचा सज्जा कोसळून १ महिला ठार, तर १ जण घायाळ

अंबरनाथ पश्चिम भागातील फातिमा शाळेच्या शेजारी असलेल्या अण्णा सोसायटीतील तिसर्‍या मजल्यावरील एका खोलीचा सज्जा २ सप्टेंबरला पहाटे ५ वाजताच्या सुमारास कोसळला.

महाराष्ट्रात कार्यान्वित न झालेले ४५ ‘ट्रॉमा केअर सेंटर’ तातडीने चालू करा !

मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर आणि औद्योगिक केंद्र असणार्‍या माणगावातही ‘ट्रॉमा केअर सेंटर’ चालू झालेले नाही.

समृद्धी महामार्गावर ८ मासांत ७२९ अपघात : १०१ जणांचा मृत्यू !

वाहनचालकांनी नियमांचे पालन करून काळजीपूर्वक वाहन चालवणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनाने सतत प्रबोधनाची मोहीम राबवावी !

मदुराई येथे रेल्वेला लागलेल्या आगीमध्ये ९ प्रवाशांचा मृत्यू

काही प्रवासी अवैधरित्या घेऊन जात असलेल्या सिलिंडर्समुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज !