मुंबई – मुंबई विमानतळावर उतरणार्या ‘व्ही.एस्.आर्. व्हेंचर्स लेअरजेट ४५’ या खासगी विमानाला १४ सप्टेंबर या दिवशी अपघात झाला. उतरत असतांना विमान धावपट्टीवर कोसळले. हा अपघात एवढा मोठा होता की, विमानाचे अक्षरश: दोन तुकडे झाले. विमानामध्ये एकूण ६ प्रवासी आणि २ कर्मचारी होते. यांतील काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे; मात्र ही संख्या अद्याप समजलेली नाही. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक अनुमान आहे. विशाखापट्टणम येथून हे विमान मुंबईला आले होते. अपघातानंतर विमानतळाची धावपट्टी बंद ठेवण्यात आली आहे.