अयोध्या येथील श्रीराममंदिराचे बांधकाम चालू असतांना घडलेल्या सूक्ष्मातील प्रक्रियेचे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या एका साधिकेने केलेले सूक्ष्म परीक्षण

‘अयोध्येत प्रभु श्रीरामाचे भव्य मंदिर बांधले जात आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये या मंदिराच्या बांधकामाची काही छायाचित्रे पाहिल्यावर श्रीराममंदिराचे बांधकाम चालू असतांना सूक्ष्मातून घडलेल्या प्रक्रियेचे साधिकेने परीक्षण केले. त्या वेळी साधिकेला  जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

प्रभु श्रीरामाचे भव्य मंदिर

१. श्रीविष्णु

१ अ. भूलोकाच्या वर वैकुंठात निर्गुण-सगुण रूपात श्रीविष्णूचे अस्तित्व जाणवणे

१ आ. क्षीरसागरातील लाटा हळूवारपणे प्रवाहित होतांना दिसणे

१ इ. ‘अयोध्या येथे श्रीराममंदिराच्या पुनर्निर्माणाची वेळ आली आहे’, असा श्रीविष्णूने संकल्प केला. हा संकल्परूपी दैवी विचार श्रीराममंदिराच्या संदर्भात न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी असलेल्या, तसेच मंदिराच्या बांधकामासाठी प्रयत्न करणार्‍या लोकांच्या मनापर्यंत पोचला.

१ ई. जेव्हा श्रीराममंदिराचे बांधकाम चालू झाले, तेव्हा श्रीविष्णु ध्यानावस्थेत होते. बांधकाम चालू झाल्यावर काही मासांनी चातुर्मासाच्या कालावधीत श्रीविष्णु निद्रावस्थेत गेले.

१ उ. भगवान शिव आणि श्रीराम यांच्याविषयी साधिकेने ईश्वराला विचारलेले प्रश्न अन् ईश्वराकडून मिळालेली उत्तरे

१ उ १. प्रश्न : चातुर्मासाच्या काळात श्रीविष्णु निद्रावस्थेत असतो आणि त्या कालावधीत भगवान शिव त्याचे कार्य करतो. श्रीराम हा श्रीविष्णूचा अवतार आहे, तर श्रीविष्णु निद्रावस्थेत असतांना श्रीरामसुद्धा निद्रावस्थेत असतो का ?

१ उ १ अ. ईश्वराकडून मिळालेले उत्तर : नाही; कारण भगवान शिव आणि श्रीराम हे एकच आहेत.

१ उ २. प्रश्न : या सूक्ष्म-चित्रात भगवान शिवाचे अस्तित्व कुठे आहे ?

१ उ २ अ. ईश्वराकडून मिळालेले उत्तर : भगवान शिव लिंगरूपात श्रीरामाच्या अंतःकरणात विराजमान आहे.

२. श्रीराम आणि सीता

अ. मंदिराचे भूमीपूजन चालू असतांना अयोध्येच्या परिसरातील आसमंतात (भूलोकात) श्रीराम आणि सीता हे सूक्ष्मातून उपस्थित होते.

आ. मंदिराचे बांधकाम चालू झाल्यावर आरंभी श्रीराम आणि सीता निर्गुण रूपात होते. जसजसे मंदिराचे बांधकाम पुढे जाऊ लागले, तसतसे ते सगुण रूपात येऊन अधिक कार्यरत झाले.

इ. श्रीरामाच्या अंतःकरणात भगवान शिव लिंगरूपात विराजमान आहेत.

३. श्रीरामतत्त्व

३ अ. श्रीरामतत्त्वाचे कण श्रीराममंदिराच्या भूमीत असणे : अयोध्या ही श्रीरामाची जन्मभूमी असल्याने आणि तेथे श्रीरामाचे सूक्ष्मातून अस्तित्व असल्याने अयोध्येत श्रीरामतत्त्वाचे कण होतेच; मात्र मंदिर नष्ट झाल्यावर श्रीरामतत्त्वाच्या कणांची संख्या उणावून ते निष्क्रीय झाले होते.

३ आ. श्रीरामतत्त्वाचे वलय मंदिरात निर्माण होऊन ते कार्यरत होणे : मंदिराचे बांधकाम होण्यापूर्वी भूमीपूजन करण्यात आले. तेव्हापासून सकारात्मक शक्ती कार्यरत होऊ लागली. पूर्वी निष्क्रीय झालेले श्रीरामतत्त्वाचे कण भूमीपूजन झाल्यावर श्रीरामतत्त्वाच्या वलयाकडे आकृष्ट झाले. त्यामुळे श्रीरामतत्त्वाचे वलय वाढत गेले.

४. त्रासदायक शक्तीचे कण

४ अ. मंदिर पाडण्याचे अधर्मी कृत्य घडल्यामुळे भूमीत त्रासदायक शक्ती निर्माण होणे : मूळ श्रीराममंदिर नष्ट करून तेथे बाबरी ढाचा बांधण्यात आला होता. मंदिर पाडण्याचे अधर्मी कृत्य घडल्यामुळे तेथील भूमीत त्रासदायक शक्ती निर्माण झाली.

५. चैतन्य

५ अ. श्रीराम आणि सीता यांच्याकडून चैतन्य प्रवाहित होणे : भूमीपूजनाच्या वेळी श्रीराम आणि नंतर सीतामाता यांनी मंदिराची भूमी, बांधकाम करणारे कामगार, वास्तुविशारद आणि दान देणार्‍या व्यक्ती यांना चैतन्याच्या माध्यमातून आशीर्वाद दिले.

५ आ. चैतन्याचे कण कार्यरत होऊन ते वातावरणात प्रवाहित होणे : मंदिराचे बांधकाम जसजसे पुढे जात होते, तसतसे चैतन्याचे कण अधिक प्रमाणात कार्यरत होऊन ते वातावरणात प्रवाहित होत होते. मंदिराचे बांधकाम करणार्‍या कामगारांना श्रीराम आणि सीता यांचे उदंड आशीर्वाद लाभले आहेत.

५ इ. चैतन्याचे वलय मंदिराची भूमी आणि भूमीपूजन केलेले स्थान यांतून प्रक्षेपित होणे : ‘ढाचा पाडल्यानंतर तेथील भूमीची विधीवत् शुद्धी करण्यात आली असावी’, असे मला वाटते. भूमीत निर्माण झालेली त्रासदायक शक्तीची स्थाने चैतन्याच्या वलयांमुळे नष्ट झाली. जसजशी भूमीतील त्रासदायक शक्ती नष्ट होऊ लागली, तसतसे चैतन्याचे वलय अधिक प्रमाणात प्रवाहित होऊ लागले.

६. आनंद

६ अ. आनंदाची स्पंदने निर्माण होऊन ती कार्यरत होणे आणि सुंदर गुलाबी फुलांच्या रूपात ती वातावरणात प्रवाहित होणे

६ आ. संपूर्ण परिसरात आनंदाचे आभामंडल (वलय) निर्माण होणे

७. श्रीरामाच्या सेवेसाठी वानरांचे वैकुंठातून पृथ्वीवर झालेले आगमन !

अ. श्रीरामाच्या वानरसेनेतील काही वानरांनी त्यांचे उर्वरित प्रारब्ध भोगून संपवण्यासाठी, तसेच ‘ईश्वरी राज्याच्या स्थापने’च्या कार्यात साहाय्य करण्यासाठी मानवदेहात जन्म घेतला आहे.

आ. वैकुंठातील इतर वानर सूक्ष्मातून उपस्थित राहून मंदिराच्या बांधकामासाठी कार्यरत असलेल्या विविध जिवांना शक्ती देत होते.

इ. जेव्हा वैकुंठात असलेल्या वानरांना ‘त्यांचे आराध्य दैवत असलेल्या श्रीरामाचे मंदिर बांधण्यात येणार आहे’, हे समजले, तेव्हा ते श्रीरामाकडे गेले.

ई. वानरांनी अत्यंत प्रेमाने आणि भक्तीभावाने मंदिराच्या बांधकामात सहभागी होण्याविषयी श्रीरामाची अनुमती मागितली.

उ. श्रीरामालाही वानरांमध्ये असलेली भावभक्ती जाणवली. त्याने अत्यंत प्रेमाने स्मित करत वानरांच्या डोक्यावरून हात फिरवला.

ऊ. श्रीराम वानरांना म्हणाला, ‘‘तुम्ही मंदिराच्या बांधकामाच्या कार्यात सहभागी होण्यासाठी जा; मात्र तेथे जाऊन मायेत अडकू नका. लवकर वैकुंठात परत या.’’

ए. वानरांनी हे मान्य केले आणि ते भूलोकात मंदिराच्या बांधकामाच्या कार्यात साहाय्य करण्यास आले.

८. ‘श्रीराममंदिर पाडणे’ हे कलियुगात कलीचा प्रभाव वाढल्याचे, तर ‘श्रीराममंदिर पुन्हा बांधणे’, हा ईश्वरी राज्याचा आरंभ होण्याचे द्योतक असणे

अ. अयोध्या ही श्रीरामाची जन्मभूमी असल्याने ती दैवी भूमी आहे. श्रीरामाच्या जन्माच्या आधीच श्रीविष्णूने अयोध्येला श्रीरामतत्त्वाचे मूळ केंद्र म्हणून निवडले होते.

आ. वर्ष १५०० मध्ये मूळ श्रीराममंदिर पाडण्यात आले. ही घटना कलियुगात कलीचा प्रभाव वाढत असल्याचे द्योतक आहे. याचे कारण मंदिर नष्ट करणे म्हणजे हिंदूंच्या मनातील धर्माभिमान नष्ट झाल्याचे आणि पर्यायाने अधर्माचरण वाढल्याचे प्रतीक होते.

इ. ‘श्रीराममंदिराचे पुनर्निर्माण होणे’, हा ईश्वरी राज्याचा आरंभ होण्याचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.

ई. मंदिरामुळे अयोध्येच्या शहराभोवती आणि काही प्रमाणात भारत देशाभोवती संरक्षककवच निर्माण होईल.

उ. श्रीराममंदिराच्या निर्मितीच्या कार्यामुळे संपूर्ण पृथ्वीवर शांतीची अनुभूती येत आहे.

९. श्रीविष्णूचा अवतार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या अस्तित्वामुळे लोकांच्या मनात श्रीरामतत्त्व कार्यरत होणे

अ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले’ या रूपात श्रीविष्णूचा अवतार झाल्यामुळे लोकांच्या मनात सूक्ष्मातून श्रीरामतत्त्व कार्यरत होत आहे. श्रीरामाचे हे तत्त्व ‘ईश्वरी राज्याच्या स्थापनेचे विचार, धर्माचरण करणे, सात्त्विक रहाणीमान अंगीकारणे’ या रूपांनी लोकांच्या मनात सूक्ष्म स्तरावर कार्यरत होत आहे.

आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या पृथ्वीवरील अस्तित्वामुळे लोकांची मने सकारात्मक होत आहेत.

इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तत्त्व सूक्ष्मातून सर्वत्र प्रवाहित होत आहे.

ई. सध्या त्यांचे तत्त्व प्रगट झाले नसून येणार्‍या आपत्काळात ते प्रगट होईल. जेव्हा ईश्वरी राज्याला आरंभ होईल आणि प्रत्यक्ष ईश्वरी राज्य स्थापन झालेले असेल, तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तत्त्व दृश्य स्वरूपात दिसेल.

१०. साधना करणार्‍या व्यक्तीला ईश्वराचे विचार सहजतेने ग्रहण करता येणे

भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी ही सात्त्विक व्यक्ती असून त्यांच्या अंतर्मनात साधनेचे संस्कार असल्याने त्यांना देवाकडून येणारे विचार ग्रहण करता येतात. श्री. मोदी श्रीरामाचे मंदिर बांधण्याविषयीचा ईश्वरी विचार ग्रहण करू शकले. सध्याच्या काळातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या श्रीराममंदिराच्या पुनर्बांधणीसाठी देवानेही त्यांना सहजतेने विचार दिले. यातून राजकारण्यांसहित सर्वच लोकांनी साधना करण्याचे महत्त्व लक्षात येते.

११. भावपूर्ण रितीने अर्पण करण्याचे महत्त्व

अ. श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाच्या वेळी अनेक लोकांनी उत्कट भाव ठेवून अर्पण दिल्याने श्रीरामतत्त्वाचे वलय अधिक प्रमाणात कार्यरत झाले.

आ. ‘अर्पण करणारी व्यक्ती किती प्रसिद्ध आहे किंवा तिने किती अर्पण केले’, यांमुळे श्रीरामतत्त्वाचे वलय अधिक प्रमाणात कार्यरत झाले नसून लक्षावधी अज्ञात लोकांनी केलेल्या भावपूर्ण अर्पणामुळे ते झाले.

इ. प्रसिद्ध व्यक्तींच्या तुलनेत सामान्य लोकांमध्ये भाव अधिक होता.

ई. ज्या लोकांनी मंदिर निर्मितीसाठी अर्पण दिले, त्यांना त्यांच्या भावाप्रमाणे या त्यागाचा आध्यात्मिक लाभ मिळेल.

१२. ईश्वरी कृपेचा महिमा

श्रीराममंदिराचे बांधकाम करणार्‍या कामगारांना ईश्वराने शक्ती दिल्याने त्यांची क्षमता वाढली आणि मंदिराचे बांधकाम लवकरात लवकर पूर्णत्वाकडे जात आहे.

१३. श्रीरामाच्या मंदिराविषयी सूक्ष्म-चित्र रेखाटण्याची सेवा करतांना आलेल्या अनुभूती

अ. ‘श्रीरामाच्या मंदिराविषयी सूक्ष्म-चित्र काढण्याची सेवा करत असतांना मंदिरासाठी अर्पण करणार्‍या लोकांविषयी जाणवलेली सूत्रे लिहितांना माझा भाव जागृत होत होता. मला त्यांच्यात श्रीरामाप्रती असलेला उत्कट भाव आणि भक्ती जाणवली.

आ. ‘श्रीराम आणि त्याची सेवा’, हाच माझ्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे’, असा भाव ठेवून त्याची भक्ती करणे, हे किती सुंदर आहे’, याची मला जाणीव झाली.

इ. वानरांविषयी लिहित असतांना मला त्यांचे श्रीरामाप्रती असलेले प्रेम जाणवत होते. मलाही ‘श्रीरामाच्या वानरसेनेतील एक वानर व्हावे’, असे वाटत होते.

ई. ‘श्रीरामाने जसा वानरांच्या डोक्यावरून हात फिरवला, तसा त्याने माझ्याही डोक्यावरून हात फिरवला’, असे मला जाणवले आणि माझे अंतःकरण भरून आले.’

– एक साधिका (२४.१२.२०२३) ॐ

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात.

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.