Shri Ramlala Live Aarti : श्री रामलल्लाची शृंगार आरती प्रतिदिन सकाळी साडेसहा वाजता दूरदर्शनवर पहाता येणार !

नवी देहली – आता दूरदर्शनची राष्ट्रीय वाहिनी ‘डीडी नॅशनल’वर अयोध्येतील प्रभु श्रीरामलल्लाचे दिव्य दर्शन प्रतिदिन घेता येणार आहे. श्रीराममंदिरात सकाळी साडेसहा वाजता होणार्‍या श्रीरामलल्लाच्या नित्य शृंगार आरतीचे थेट प्रक्षेपण प्रसारित केले जाईल, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

ठाकूर म्हणाले की, भगवान श्रीरामावरील भक्तांची अनन्य श्रद्धा लक्षात घेऊन ‘प्रसार भारती’ने ही मोठी सुविधा चालू केली आहे.