(म्हणे) ‘दारू, तंबाखू, गुटखा यांप्रमाणे कर भरून अमली पदार्थ सेवन करण्याची अनुमती द्या !’ – काँग्रेसचे खासदार के.टी.एस्. तुलसी यांची मागणी

जे समाजाच्या आणि प्रत्येक नागरिकाच्या हिताचे नाही, ती प्रत्येक गोष्ट बंद करणेच आवश्यक आहे. दारू, तंबाखू, गुटखा यांच्या सेवनावरही बंदी घालणे आवश्यक आहे.

पाटलीपुत्र (बिहार) येथे वर्ष २०१३ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये झालेल्या बाँबस्फोटांच्या प्रकरणी ९ जण दोषी

पाटलीपुत्र येथील गांधी मैदानात २७ ऑक्टोबर २०१३ या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेच्या वेळी झालेल्या बाँबस्फोटांच्या प्रकरणी एन्.आय.ए.च्या विशेष न्यायालयाने १० आरोपींपैकी फखरुद्दीन नावाच्या आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

इस्लामी देश इंडोनेशियामध्ये ७० सहस्र मशिदींच्या ध्वनीक्षेपकाचा आवाज न्यून !

जगभरातील सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या असणार्‍या देशात सहस्रो मशिदींवरील ध्वनीक्षेपकाचा आवाज न्यून होऊ शकतो, तर धर्मनिरपेक्ष भारतात अवैधरित्या चालू असणारा आवाज बंदही होऊ शकतो !

मुलाला अमली पदार्थांच्या सेवनाच्या प्रकरणी अटक करण्यात आल्यावर अभिनेते जॅकी चॅन याने मागितली होती क्षमा !

कुठे मुलाच्या कृत्याविषयी क्षमा मागणारे विदेशी अभिनेते जॅकी चॅन, तर कुठे भारतातील अभिनेते !

पेट्रोलच्या अवैध विक्री व्यवसायाविरोधात बातमी दिल्याच्या रागातून पुणे येथील पत्रकाराची हत्या करणार्‍यास ५ वर्षांची शिक्षा !

आरोपीने मृत पत्रकाराच्या घायाळ भावाला ३० सहस्र रुपये हानीभरपाई द्यावी, असेही निकालपत्रात नमूद करण्यात आले आहे.

पाकमध्ये मदरशामध्ये बलात्कार करणार्‍या मौलवीला (इस्लामच्या धार्मिक नेत्याला) जन्मठेपेची शिक्षा

पाकच्या एका न्यायालयाने १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अतीक उर् रहमान नावाच्या मौलवीला (इस्लामच्या धार्मिक नेत्याला) जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच त्याला २ लाख रुपयांचा दंडही करण्यात आला आहे.

निवडणूक प्रचारात अधिकची रक्कम व्यय केल्यामुळे फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींना शिक्षा !

निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिकची रक्कम निवडणुकीत व्यय केल्याच्या प्रकरणी फ्रान्सचे माजी राष्ट्रपती निकोलस सर्कोझी यांना न्यायालयाने १ वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

संभाजीनगर येथील गतिमंद मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी बसचालकाला ३ वर्षांची शिक्षा आणि १ लाख रुपयांचा दंड !

या प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापिकेने तक्रार दिली होती. १७ जानेवारी २०२० या दिवशी आरोपी अविनाशने त्यांना एका ‘व्हॉट्सॲप’वर व्हिडिओ पाठवला होता.

महिलेकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे धैर्य होऊ नये, अशी कठोर शिक्षा आरोपींना व्हायला हवी ! – सौ. पंकजा मुंडे-पालवे, भाजप

आपल्या राज्यात, देशात आणि संस्कृतीत महिलांना पूजनीय स्थान देण्यात आले आहे. महिला अत्याचारातील घटनांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढायला हवे. ‘अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यास आरोपीला देहदंडाची शिक्षा करावी’, अशी मागणी आम्ही लावून धरली; पण आजचे चित्र विदारक आहे..

 ८० वर्षांच्या वृद्ध महिलेवर अत्याचार !

आरोपीला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ! समाज पराकोटीचा रसातळाला गेल्याचे उदाहरण !