
संभाजीनगर – ८ वर्षांच्या अल्पवयीन गतिमंद मुलीचा विनयभंग करतांनाचा व्हिडिओ सिद्ध करून तो प्रसारित करणारा बसचालक अविनाश शेजूळ (रा. पंढरपूर) याला ३ वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली १ लाख २ सहस्र २०० रुपये दंड, अशी शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश के.आर्. चौधरी यांनी २९ सप्टेंबर या दिवशी ठोठावली आहे.
या प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापिकेने तक्रार दिली होती. १७ जानेवारी २०२० या दिवशी आरोपी अविनाशने त्यांना एका ‘व्हॉट्सॲप’वर व्हिडिओ पाठवला होता. त्यामध्ये त्यांच्याच शाळेतील बसचालक शेजूळ हा २ मित्रांसह गतिमंद मुलीचा विनयभंग करून तिला मारहाण करत असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर मुख्याध्यापिकेने ही माहिती पीडितेचे आई-वडील आणि शाळेतील पदाधिकारी यांना दिली होती.
१८ जानेवारी २०२० या दिवशी आरोपी शेजूळ याला घटनेचा जाब विचारला असता त्याने १६ जानेवारी या दिवशी दुपारी ४.३० वाजता शाळा सुटल्यानंतर मुलांना सोडायला जातांना बसमध्ये हा व्हिडिओ बनवल्याचे सांगितले. ‘आरोपी अविनाश हा आम्हाला कापून टाकण्याची धमकी देत होता’, असे काही मुलांनी सांगितले. खटल्याच्या सुनावणीच्या वेळी साहाय्यक लोकाभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी तक्रारदारसह पीडिता आणि अन्वेषण अधिकारी तथा तत्कालीन पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे यांची साक्ष नोंदवली होती.
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !
स्थानांतरासाठी शिक्षकाकडून २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अधिकारी डी.सी. कुंभार यांना अटक
शिक्षकी पेशाचे अधःपतन !
अक्कलकोट येथे शाळकरी मुलीवर अत्याचार करणार्या अरबाजला अटक !