पुणे पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचार्‍याची आत्महत्या !

पोलिसांनी आत्महत्या करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत, हे गंभीर आहे. पोलीस खात्याने याचा अभ्यास करून उपाययोजना काढणे अपेक्षित आहे.

दहावीच्या मूल्यमापन प्रक्रियेमध्ये संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून गुणांची नोंदणी करतांना शाळास्तरावर त्रुटी राहिल्याचे निदर्शनास !

शाळांना मूल्यमापनाच्या गुणांची नोंद करण्याचे प्रशिक्षण दिले नव्हते का ? हे विद्यार्थ्याच्या भवितव्याशी खेळणे आहे ? शाळा प्रशासनामध्ये संवेदनशीलता का नाही ?

शिवाजीराव भोसले बँकेचे पुणे येथील ३ शाखा व्यवस्थापक कह्यात !

वर्ष २००७ मध्ये कर्ज मंजुरी देतांना अनियमितता झाली असून या तिघांनीही आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून कर्ज मंजूर केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना कह्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी दिली.

पुणे येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात पैशासाठी रुग्णाचा मृतदेह अडवला, सामाजिक कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केल्याने देयक माफ केले !

रुग्णाच्या नातेवाइकांनी २ लाख ५० सहस्र रुपये जमा केले होते.

एम्.पी.एस्.सी. उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने पुण्यातील तरुणाची नैराश्यातून आत्महत्या !

फरसुंगी येथील गंगानगर येथे त्याच्या रहात्या घरी घडली. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावांतील सरकारी यंत्रणा वर्ग होणार

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावांतील सरकारी रुग्णालये, शाळा, पाणी योजना, अंगणवाड्या, अधिकारी आणि कर्मचारी यांना महापालिकेत वर्ग करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

पायी वारीसाठी निघालेले संतवीर बंडातात्या कराडकर यांना कह्यात घेऊन सोडले !

पायी वारीसाठी निघालेले संतवीर बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. त्यांना फलटण येथील गुरुकुलमध्ये ठेवण्यात आले आहे. संतवीर बंडातात्या कराडकर यांना दिसताच क्षणी कह्यात घेण्याचा आदेश पोलिसांना देण्यात आला होता.

जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विक्री ! – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या अनुषंगाने अंमलबजावणी संचानालयाने (ईडी) अजित पवार यांच्या नातेवाइकांच्या कह्यात असलेल्या ‘जरंडेश्वर शुगर्स’ कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने देहूतून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान

‘ज्ञानोबा-तुकाराम’ अशा नामघोषांच्या गजरात भक्तीमय वातावरणात आषाढी वारीच्या निमित्ताने संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने १ जुलै या दिवशी दुपारी ३ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान केले.