आषाढी एकादशीच्या निमित्ताने देहूतून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान

संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

देहू (पुणे), १ जुलै – ‘ज्ञानोबा-तुकाराम’ अशा नामघोषांच्या गजरात भक्तीमय वातावरणात आषाढी वारीच्या निमित्ताने संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने १ जुलै या दिवशी दुपारी ३ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान केले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारी आदेशानुसार मोजक्या वारकर्‍यांच्या उपस्थितीतच हा सोहळा झाला. देऊळवाड्यात प्रमुख दिंडीतील २५० वारकर्‍यांना दर्शनासाठी संस्थानने अनुमती दिली होती.

देहू मंदिरात छत्रपती संभाजीराजे भोसले (खासदार) यांनी सपत्नीक पादुकांचे पूजन आणि आरती केली

देहू मंदिरात छत्रपती संभाजीराजे भोसले (खासदार) यांनी सपत्नीक पादुकांचे पूजन आणि आरती केली. वढू येथील वारकरी बहुमत शिवले यांनाही पूजेचा मान मिळाला. प्रस्थान झाल्यानंतरही तुकाराम महाराज यांच्या पादुका १८ जुलैपर्यंत देहू येथील मुख्य मंदिराच्या गाभार्‍यातच रहाणार आहेत. आषाढ शुद्ध दशमीला म्हणजे १९ जुलैला त्या बसमधून आषाढी एकादशीसाठी मार्गस्थ होऊ वाखरी येथे जातील.

पालखी सोहळ्याला वारकरी भक्तिमय वातावरणात सुरुवात
छत्रपती संभाजीराजे यांनी वारकऱ्यांमध्ये जाऊन फुगडी खेळली