पोलिसांनी आत्महत्या करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत, हे गंभीर आहे. पोलीस खात्याने याचा अभ्यास करून उपाययोजना काढणे अपेक्षित आहे.
पिंपरी (पुणे) – पुणे पोलीस आयुक्तालयात विशेष शाखेत कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी श्रद्धा जायभाय (वय २८ वर्षे) यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अजून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. फोन लावल्यावर प्रतिसाद न दिल्याने त्यांच्या मैत्रिणीने तिथे रहात असणार्या ओळखीच्या व्यक्तीला घरी जाऊन पहाण्यास सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली.