
पिंपरी चिंचवड (पुणे), ५ जुलै – येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आशिष कांबळे या रुग्णाच्या देयकासाठी ५ लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती. रुग्णाच्या नातेवाइकांनी २ लाख ५० सहस्र रुपये जमा केले होते; पण त्या रुग्णाचा मृत्यू झाला आणि उर्वरित पैसे भरल्याशिवाय मृतदेह देण्यास रुग्णालयाने नकार दिल्यामुळे मृताच्या नातेवाइकांनी सामाजिक कार्यकर्त्यांचे साहाय्य घेतले. कार्यकर्त्यांनी रुग्णालयात ठिय्या आंदोलन केल्याने रुग्णालयाने २ लाख ५० सहस्र रुपयांचे देयक माफ केले आणि त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला.
भित्तीपत्रक लावणार्या महिला अधिकार्याचे स्थानांतर ! – नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त
पनवेल रेल्वेस्थानक परिसरात बेकायदेशीर खाद्यविक्री चालू !
भीमाशंकर भाविकांसाठी प्रवेशिका (पास) घेण्याचा सक्तीचा निर्णय प्रशासनाने मागे घेतला !
अन्न सुरक्षेशी संबंधित गंभीर त्रुटी आढळल्याने पुणे विद्यापिठाच्या खानावळीचा परवाना रहित
महात्मा फुले वाड्यापुढील वटवृक्ष पूजनावर बंदी घालणारा पुरातत्व विभागाचा ‘तुघलकी’ निर्णय त्वरित रहित करा !
राखीव वनक्षेत्रात शिकार करणार्या ८ जणांना अटक