माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणार्‍या तरुणाची आत्महत्या !

मनाच्या दुर्बलतेमुळे कठीण प्रसंगाला सामोरे जाता न आल्याने मानसिक ताण येतो. मनाला सक्षम आणि कणखर करण्यासाठी साधना करणेच आवश्यक आहे. साधनेमुळे मनुष्याला आत्मबळ प्राप्त होऊन तो कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो.

सामाजिक माध्यमांद्वारे फसवणूक करणार्‍यांवर एम्.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई करण्यात यावी ! – डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद

राज्यात सामाजिक माध्यमांवर कार्यरत असलेल्या मुलींवर पाळत ठेवून त्यांना फसवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात चालू आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यातील बिबवेवाडी परिसरात योगेश गायकवाड या आरोपीने जवळपास ५७ तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून फसवल्याची घटना समोर आली आहे.

पुणे येथे बनावट कागदपत्रे न्यायालयात सादर केल्याने गुन्हा नोंद !

गुन्हेगारांना कायद्याचे भय नसल्याचे उदाहरण ! बनावट कागदपत्रे सिद्ध करून देणार्‍यांचा शोध घेऊन त्यांनाही कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे !

कोरोनाच्या काळात पुणे येथील आरोग्य कर्मचार्‍यांसाठी उपलब्ध केलेल्या हॉटेल्समधील ९ हॉटेल्सची देयके गायब !

प्रशासनाचा भोंगळ कारभार ! देयके गायब कशी होतात, हे पाहून संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.

चोरीचे १२५ हून अधिक गुन्हे असलेल्या सराईत चोरांपैकी दोघांना पुणे येथे दरोडा टाकून पळून जात असतांना अटक !

चोरांना कठोर शिक्षा न झाल्यामुळेच ते परत परत चोरी करत आहेत, असेच म्हणावे लागेल. चोर सराईत होणे हे पोलिसांचे अपयश नव्हे का ?

‘बी.एच्.आर्.’ पतसंस्थेतील फसवणूक आणि अपहार प्रकरणात भाजपचे विधान परिषदेचे आमदार चंदुलाल पटेल संशयित आरोपी !

जळगाव येथील भाजपचे विधान परिषदेचे आमदार चंदुलाल पटेल यांच्या विरुद्ध अटक वॉरंट निघाले होते. पटेल हे अद्याप पसार आहेत.

वार्षिक अंदाजपत्रक फुगवल्याने पुणे महापालिकेचे आर्थिक नियोजन कोलमडले !

वस्तूस्थितीला धरून अंदाजपत्रक का केले जात नाही ? अंदाजपत्रकाच्या रकमा वाढीव दाखवून स्थायी समितीला नक्की काय साधायचे आहे ?, असा प्रश्न कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

टाळ-मृदुंगाच्या निनादात रंगला संत सोपानदेवांचा पालखी प्रस्थान सोहळा !

६ ते १८ जुलै या कालावधीत पालखीचा मुक्काम समाधी मंदिरात सासवडलाच असेल. आषाढ शुद्ध दशमीला म्हणजे १९ जुलै या दिवशी सरकारने दिलेल्या २ बसमधून ‘श्रीं’च्या पादुका पंढरपूरकडे प्रस्थान करतील.

पुणे येथे आमदार निलंबनाच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन !

भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना मागण्यांचे निवेदन दिले. आरक्षण मिळावे यासाठी भाजपचा संघर्ष कायम रहाणार असल्याचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले.

स्वप्नील लोणकर आत्महत्येच्या निषेधार्थ पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन !

स्वप्नील लोणकर या एम्.पी.एस्.सी. परीक्षेच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर या घटनेच्या निषेधार्थ स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागावा आणि स्वप्नील लोणकरला न्याय मिळावा या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले.