सदनिकेच्‍या क्षेत्रफळानुसारच देखभाल शुल्‍क आकारण्‍याचे सहकार विभागाचे आदेश !

सहकारी गृहनिर्माण संस्‍थेमधील सदनिकांच्‍या क्षेत्रफळानुसारच सोसायटीने देखभाल शुल्‍क (मेंटेनन्‍स चार्जेस) आकारावे, असा आदेश सहकारी संस्‍था पुणे शहर एकचे उपनिबंधक दिग्‍विजय राठोड यांनी दिला आहे.

गुण वाढवून देतो असे सांगत विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणार्‍या पुणे येथील कर्मचार्‍याच्या तोंडाला काळे फासून धिंड काढली !

अशा वासनांधांना कठोर शिक्षा करायला हवी तरच ते असा गुन्हा करण्यास धजावणार नाहीत !

पुण्यातील महिला डॉक्टरच्या स्नानगृहामध्ये छुपे कॅमेरे लावणार्‍या आधुनिक वैद्यांना अटक !

उच्चशिक्षित आधुनिक वैद्यांना न शोभणारी घटना ! असे आधुनिक वैद्य वैद्यकीय क्षेत्राला कलंकच आहेत. वासनेच्या आहारी गेलेल्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.

महापालिकेने नेमलेल्या लेखापरीक्षकांनी खासगी रुग्णालयांच्या देयकांची रक्कम अल्प करण्यास भाग पाडले !

रुग्णांच्या देयकांची रक्कम अल्प करण्यासमवेत अधिक रक्कम लावलेल्या रुग्णालयांना शिक्षा होणे अपेक्षित आहे !

बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद !

बैलगाडा शर्यतीवर बंदी असतांनाही मावळातील शिवणे गावाच्या हद्दीत मोकळ्या माळावर बैलगाडा शर्यतीचे आयोजन करणार्‍या २० युवकांवर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून पोलिसांनी आयोजकांना कह्यात घेतले आहे.

चांगली नोकरी लावण्याच्या आमीषाने फसवणार्‍या ‘कॉल सेंटर’वर सायबर पोलिसांची कारवाई !

चांगल्या पगाराची नोकरी लावण्याच्या आमीषाने फसवणार्‍या ‘कॉल सेंटर’वर कारवाई करण्यात सायबर पोलिसांना यश मिळाले असून ४ जणांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. समाजाची नीतीमत्ता खालावत चालल्याचे उदाहरण !

पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी रवींद्र बिनवाडे यांची निवड

बिनवाडे हे मूळचे बीडचे असून, ते वर्ष २०१२ च्या तुकडीचे प्रशासकीय अधिकारी आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत महसूल आणि पोलीस या विभागांतील लाचखोर सर्वाधिक !

लाचखोरांवर वेळीच कठोर कारवाई न होण्याचे हे गंभीर परिणाम ! लाचखोरीमुळे पोखरल्या गेलेल्या सरकारी यंत्रणा कधी सुधारणार ? लाचखोरांना कठोर शिक्षा केल्यासच या प्रकाराला आळा बसेल.

पुण्यासह राज्यात ‘हायप्रोफाईल सेक्स रॅकेट’ चालवणार्‍या एजंटला गुजरातमधून अटक !

पुण्यासह राज्यात ‘हायप्रोफाईल सेक्स रॅकेट’ चालवणार्‍या तसेच मागील ४ वर्षांपासून पसार असलेल्या शिवा एजंट उपाख्य शिवा चौधरी यास पुणे येथील खंडणी विरोधी पथकाने गुजरातमधील सुरत येथून अटक केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या संदर्भातील ‘झोटिंग समिती’चा गोपनीय अहवाल मंत्रालयातून गहाळ !

माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावरील भोसरी (पुणे) येथील औद्योगिक वसाहतीमधील भूखंड खरेदी प्रकरणात झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी तत्कालीन सरकारने न्यायमूर्ती झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली ‘झोटिंग समिती’ नियुक्त केली होती.