महापालिकेने नेमलेल्या लेखापरीक्षकांनी खासगी रुग्णालयांच्या देयकांची रक्कम अल्प करण्यास भाग पाडले !

रुग्णांच्या देयकांची रक्कम अल्प करण्यासमवेत अधिक रक्कम लावलेल्या रुग्णालयांना शिक्षा होणे अपेक्षित आहे !

पुणे महानगरपालिका

पुणे – कोरोनाबाधित रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार करतांना अनेक वेळा वाढीव देयके रुग्णाला दिली आहेत. याविषयीच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने पुणे महानगरपालिकेने रुग्णालयांचे दर नियंत्रणात रहावेत, यासाठी ऑगस्ट २०२० मध्ये रुग्णांवर केले जाणारे उपचार, खाटा, खोलीचे भाडे यांसह अनेक गोष्टींचे दर निश्चित करून त्यापेक्षा अधिक पैसे घेण्यावर बंधने आणली, तसेच रुग्णालयांमध्ये महापालिकेचे लेखापरीक्षक नेमून देयकांची तपासणीही केली. त्यामुळे गेल्या ११ मासांत खासगी रुग्णालयांना ५ कोटी २१ लाख रुपयांचे देयक अल्प करण्यास भाग पाडले आहे. याचा लाभ १ सहस्र ७२४ नागरिकांना झाला. १ ते ७ जुलै या कालावधीत महापालिकेकडे १८८ नागरिकांनी वाढीव देयकासंबंधी तक्रारी केल्या होत्या. त्यातील १७ लाख २१ सहस्र ४२ रुपयांच्या देयकाची रक्कम अल्प केली आहे.