पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी रवींद्र बिनवाडे यांची निवड

रवींद्र बिनवाडे

पुणे,१४ जुलै – पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांची एकात्मिक बाल विकास योजनेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. पुण्यात कोरोनाने थैमान घातलेले असतांना रुबल अग्रवाल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवाडे हे नवे अतिरिक्त आयुक्त असणार आहेत. राज्य सरकारने १३ जुलै या दिवशी हे बदलीचे आदेश काढले.

बिनवाडे हे मूळचे बीडचे असून, ते वर्ष २०१२ च्या तुकडीचे प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यापूर्वी संगणक अभियंता झाल्यानंतर ते मुंबई आणि पुण्यातील माहिती-तंत्रज्ञान आस्थापनात कार्यरत होते.