पुण्यात पोलिसानेच पोलिसाला मारण्यासाठी गुन्हेगाराला सुपारी दिली !

गुन्हेगारी प्रवृत्तीचे पोलीस ! ‘सद्‌रक्षणाय, खलनिग्रहणाय’ हे पोलिसांचे ब्रीद आहे. त्याच्या विपरीत वागणारे, असे पोलीस खात्यात असणे लज्जास्पद आहे !

पुण्यातील ‘महामेट्रो’चा राडारोडा मुठा नदीपात्रात टाकला जात आहे !

यादवाडकर यांनी सांगितले की, नदीपात्रांमध्ये आधीच मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत आहेत. त्यामुळे गेल्या २-३ वर्षांपासून नदीची वहनक्षमता अल्प होत आहे.

पुणे जिल्ह्यात १ सहस्र २८९ बालके मध्यम कुपोषित आणि ३७१ बालके अतीतीव्र कुपोषित !

एका पुणे जिल्ह्यात सहस्रो बालके कुपोषित असणे चिंताजनक आहे. ही महाराष्ट्राची प्रगती म्हणायची का ? बालक म्हणजे देशाची भावी पिढी, हे लक्षात घेऊन कुपोषित बालकांचे प्रमाण अल्प करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

पुणे जिल्ह्यातील प्रशासन, पोलीस तसेच शाळा-महाविद्यालये यांना निवेदनाद्वारे गैरप्रकार रोखण्याचे आवाहन !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस आणि प्रशासन यांना ३१ डिसेंबर या दिवशी होणारे गैरप्रकार रोखण्यासंदर्भातील निवेदन देण्यात आले. या वेळी पोलीस अधिकारी आणि तहसीलदार यांनी समितीच्या उपक्रमाचे कौतुक केले.

आरोग्य भरतीचा पेपर ‘न्यासा’ आस्थापनातूनही फुटल्याचे उघड !

दोन एजंटानी फोडलेले पेपर काही परीक्षार्थींना ५ ते ८ लाख रुपये घेऊन दिल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत ५ गुन्हे नोंद झाले असून २८ आरोपींना अटक केली आहे.

‘टीईटी’ अपव्यवहार प्रकरणी अश्विन कुमारांच्या घरी पोलिसांची धाड !

पोलिसांनी २ स्वतंत्र गुन्हे नोंद केले असून आतापर्यंत तत्कालीन आयुक्त सुखदेव ढेरे, सुपे, ‘जी.ए. सॉफ्टवेअर’चे संचालक डॉ. प्रीतीश देशमुख, अश्विन कुमार, वर्ष २०२१ ची टीईटी परीक्षा घेणार्‍या आस्थापनाचे प्रमुख सौरभ त्रिपाठी यांना अटक केली आहे.

प्रभु श्रीरामांचे जीवन युगानुयुगे देशाच्या प्रेरणेचा स्रोत ठरत आहे ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

‘शिक्षण प्रसारक मंडळी’ आणि ‘अमृतसंचय प्रतिष्ठान’ यांच्या वतीने धनंजय कुलकर्णी लिखित ‘पत्ररूप भावार्थ गीत रामायण’ या ग्रंथाचे आणि या ग्रंथाच्या ब्रेल लिपीतील रूपांतर असलेल्या ग्रंथाचे प्रकाशन कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.

पुणे येथील मायलेकींच्या मृत्यूनंतर २९ वर्षांनी न्याय !

या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पीडित महिलेच्या आत्महत्येनंतर २९ वर्षांनी आरोपी पतीला दोषी ठरवून ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा दिली आहे. 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ! – खासदार श्रीरंग बारणे, मावळ (शिवसेना)

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अजूनपर्यंत न मिळणे आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागणे, हे दुर्दैवी !

पुणे येथील मायलेकींच्या मृत्यूनंतर २९ वर्षांनी मिळाला न्याय !

विलंबाने न्याय मिळाल्यास संबंधिताला अन्याय झाल्यासारखे वाटू शकते !