पुण्यात पोलिसानेच पोलिसाला मारण्यासाठी गुन्हेगाराला सुपारी दिली !

  • गुन्हेगारी प्रवृत्तीचे पोलीस ! – संपादक 
  • ‘सद्‌रक्षणाय, खलनिग्रहणाय’ हे पोलिसांचे ब्रीद आहे. त्याच्या विपरीत वागणारे, असे पोलीस खात्यात असणे लज्जास्पद आहे ! – संपादक 

पुणे – नितीन दुधाळ या पोलीस कर्मचार्‍यानेच योगेश अडसुळ या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला दुसर्‍या पोलीस कर्मचार्‍याला मारण्याची सुपारी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी कट रचून हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. योगेश अडसुळ याला अटक केली आहे. नितीन दुधाळ याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला असून तो पसार झाला आहे.

(सौजन्य : ABP MAJHA)

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२१ पासून १ जानेवारी २०२२ पर्यंत हडपसर आणि दत्तवाडी परिसरात घडला आहे.