मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अजूनपर्यंत न मिळणे आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागणे, हे दुर्दैवी ! -संपादकीय
पुणे – मराठी भाषेला गौरवशाली आणि ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रातील मुख्य भाषा मराठी आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर जगभरातील मराठी माणसांच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी आग्रही मागणी मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. यासंदर्भात लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिले. त्यामुळे ‘मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल’, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला आहे.