कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला पुन्हा ६ मास मुदतवाढ !

आयोगाचे कामकाज पूर्ण करण्यास आणि शासनास अंतिम अहवाल सादर करण्यासाठी ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे राज्याच्या गृह विभागाचे सहसचिव प्र.ग. देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

बनावट संकेतस्थळाद्वारे अपात्र उमेदवारांचे निकाल घोषित करून पैसे उकळले !

अशांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे !

ग्रामपंचायतीमधील भरती प्रक्रियेत दोषी आढळलेले १६ अधिकारी निलंबित ! – आयुष प्रसाद, मुख्यकार्यकारी अधिकारी

भ्रष्टाचाराची ही कीड मुळापासूनच नष्ट व्हायला हवी. केवळ निलंबन नको, तर बडतर्फ आणि कठोर शिक्षाच हवी !

आनंदी जीवनासाठी नामजप तसेच स्वभावदोष आणि अहं निर्मूलन आवश्यक ! – श्रीकांत बोराटे

श्री दत्तजयंतीनिमित्त माळवाडी (जिल्हा पुणे) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचन !

मेट्रोमुळे पुण्याच्या विकासात भरच पडणार आहे ! – मानाच्या गणपतींकडून सकारात्मक भूमिका

पुणे येथील संभाजी पुलावरील मेट्रोच्या पुलाचा वाद

पुणे येथे २३३ कोटींची खोटी देयके देणार्‍या धर्मांध व्यापार्‍यास अटक !

अल्पसंख्य म्हणवणारे धर्मांध फसवणूक, गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार अशा सर्वच गैरप्रकारांत आघाडीवर असणे, हे देशासाठी घातक आहे. अशा धर्मांधांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.

आश्वासन देऊनही अभियांत्रिकीची बनावट पदविका घेतलेल्या कर्मचार्‍यांची चौकशी चालू केली नाही ! – आम आदमी पक्षाचा आरोप

मान्यता नसलेल्या संस्थांमधून अभियांत्रिकीची बनावट पदविका मिळवून काही कर्मचार्‍यांनी महापालिकेत पदोन्नती मिळवली असल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर महापौरांनी आश्वासन देऊनही प्रशासनाने चौकशी चालू केली नाही.

हलाल अर्थव्यवस्थेच्या विरोधात कृतीशील होण्याचा पुणे येथील राष्ट्र आणि धर्म प्रेमी महिलांचा निर्धार !

येथील जिज्ञासू श्री. राजेंद्रजी लुंकड यांच्या धर्मपत्नी सौ. कमल लुंकड यांच्या संपर्कातील महिलांसाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ या विषयासंदर्भात जागृती करण्यासाठी एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील कामकाज संपामुळे ठप्प !

राज्यातील विद्यापिठांतील महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन आणि विद्यापिठीय सेवक संयुक्त कृती समितीने २ दिवसांपूर्वी ‘बेमुदत’ संप पुकारला आहे. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत